Raigad Republican Dhavare : अप्पा धावारेंच्या आठवणीत रमले ‘रिपब्लिकन’

Raigad Republican Dhavare : अप्पा धावारेंच्या आठवणीत रमले ‘रिपब्लिकन’

साहेबराव ऊर्फ अप्पा धावारे यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आवर्जून उपस्थित राहिले.

आपलं महानगर वृत्तसेवा

खोपोली : साहेबराव ऊर्फ अप्पा धावारे यांनी आयुष्यभर समाजाच्या न्यायहक्कासाठी लढा दिला. दलित चळवळ तसेच रिपब्लिकन पक्षासाठी योगदान दिले. त्यामुळे दलित समाज त्यांना कायम स्मरणात टेवेल, या शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अप्पा धावारे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

रिपब्लिकन पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस साहेबराव धावारे यांचे नुकतेच अल्पशा आजारपणामुळे निधन झाले. म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खोपोलीत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा… Raigad karjat tree cutting : अधिकारी निवडणूक कामात, वृक्षतोड जोरात

यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, आरपीआय प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कांबळे, कोकण प्रदेश अध्यक्ष मोरे, उपाध्यक्ष राहुल डांळीबकर, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक, शेकापचे खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील, संतोष जंगम, भाजपचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल पाटील, वंचितचे दीपक गायकवाड, काँग्रेसचे सागर जाधव, आपचे डॉ. शेखर जांभळे, याच्यासह रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा… Raigad Police Targeted criminals : रायगड पोलीस गावगुंडांविरोधात सक्रिय

मी नगराध्यक्ष असताना त्यांना स्वीकृत नगरसेवक करण्याबाबत प्रस्ताव ठेवला होता. मात्र, धावारे यांनी सत्तेत रस नसल्याचे सांगितले, आणि आपल्याला समाजकारणात आवड आहे, अशी आठवण दत्ताजीराव मसूरकर यांनी सांगितली. तर रिपब्लिकन पक्षातून निलंबित केलेले जगदीश गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अचानक येण्याने वातावरण काहीसे गंभीर झाले होते. ते निघून गेल्यानंतर वातावरण लगेच निवळले.

First Published on: April 26, 2024 1:27 AM
Exit mobile version