नगरपंचायत द्या, मी तुम्हाला देखणं शहर देतो – प्रवीण दरेकर

नगरपंचायत द्या, मी तुम्हाला देखणं शहर देतो – प्रवीण दरेकर

पोलादपूर नगरपंचायत द्या, मी तुम्हाला देखणं शहर देतो असे आश्वासन भाजपा नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले. नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराची सांगता रविवारी प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढून झाली.

यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दरेकर म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील निवडणूकीमध्ये जनतेने आशिर्वाद दिला आहे. दुसर्‍या टप्प्यातही जनता कौल देईल असा मला ठाम विश्वास वाटतो. कारण पोलादपूरकरांसाठी भारतीय जनता पक्षा ची पाटी कोरी आहे. यापूर्वी पोलादपूरवासियांनी शिवसेनेला संधी देऊन बघितली. मात्र शहरभर फेरफटका मारलात तर कोठेही अभिमान वाटेल असे मूलभूत काम, सोयीसुविधा दिसून येत नाहीत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही संधी दिली होती. मात्र आता पोला दपूरकर परिवर्तनाच्या मूडमध्ये दिसत आहेत आणि ते परिवर्तन करण्यासाठीच सक्षम पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी निवडणुकीत उतरली आहे. नागरिकांसमोर एक देखणे, स्वच्छ आणि सुविधांनी परिपूर्ण असे पोलादपूरकरांच्या मनातले शहर उभारणीचा मानस यावेळी दरेकर यांनी व्यक्त

भारतीय जनता पक्षाचे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात नरेंद्र फडणवीस नेतृत्व करतात. आता पाच वर्षे आम्हाला द्या. रस्ते, गटारे, सांडपाणी व्यवस्था, स्व च्छ पाणी आदी मूलभूत सोयीसुविधा, नगरपंचायतीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार तसेच सर्व विभाग एकत्र असलेली नगरपंचायतीची इमारत आदी लोकोपयोगी विकासकामे आम्ही पाच वर्षा त करू असा शब्द मी पोलादपूरकरांना देतो, असेही आश्वासन यावेळी दरेकर यांनी दिले. नगरपंचायतीच्या दुसर्‍या टप्प्याच्या चार जागांसाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. भाजपाकडू रचना धुमाळ अंकीता जांभळेकर, प्रतिक सुर्वे, संभाजी माने असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

First Published on: January 17, 2022 9:41 PM
Exit mobile version