रेशनिंग दुकानाचा परवाना अखेर रद्द; पाचाड मधील आंदोलनाला यश

रेशनिंग दुकानाचा परवाना अखेर रद्द; पाचाड मधील आंदोलनाला यश

 महाड: ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये रेशनिंग दुकानदाराकडून रेशन धारकांना कमी प्रमाणात धान्य देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. ग्रामस्थांच्या वतीने शाश्वत धेंडे यांनी याबाबत  आमरण उपोषण केले होते. यावर सखोल चौकशी करून अखेर सदर रेशनिंग दुकानधारकाचा परवाना रद्द करण्यात येत असल्याचे लेखी पत्र ग्रामस्थांना प्राप्त झाले आहे.

पाचाड गावामध्ये सुमारे ३८० रेशन कार्डधारक आहेत. या ठिकाणी रेशनिंग दुकान परवाना राजेंद्र खातू यांना देण्यात आला होता मात्र सदर दुकान हे युनुस सय्यद हे चालवत होते. रेशनिंग दुकान चालवत असलेल्या दुकानदाराकडून रेशन कार्ड धारकांना व अपमानास्पद वागणूक देणे तसेच शासनाने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात धान्य दिले जात असल्याचा आरोप करत शाश्वत धेंडे यांनी करून याबाबत जोपर्यंत सखोल तपास होत नाही आणि रेशनिंग दुकानाचा परवाना रद्द केला जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यानुसार दिनांक २२ फेब्रुवारीपासून हे उपोषण आंदोलन सुरू झाले होते. मात्र प्रशासनाकडून वारंवार चालढकल आणि सुनावणी लावण्यात केली जाणारी टाळाटाळ यामुळे हे प्रकरण चिघळले होते. अखेर आज याबाबत आदेश प्राप्त झाला असून रेशनिंग दुकानदार याचा परवाना रद्द केला असल्याचे कळवले पत्र दिले आहे. प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय नवले यांनी हा आदेश काढला आहे. तात्पुरत्या स्वरूपात हे दुकान कोंझर येथे जोडण्यात आले आहे.

First Published on: March 25, 2023 10:15 PM
Exit mobile version