पाली नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था, ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

पाली नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था, ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

सुधागड तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्रापैकी पाली नगरपंचायतीच्या हद्दीतील आगर आळी येथील शौचालयांची दुरावस्था झाली आहे. शौचालयाला दरवाजा नसून छप्पराचे पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्वच्छता नसल्याने जागोजागी दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आगर आळी येथील नागरिक तसेच बाहेरून येणार्‍या लोकांची यामळे गैरसोय होत आहे.
पाली नगरपंचायत हद्दीतील अनेक शौचालयांची दुरावस्था झाली आहे.

नगरपंचायतीने या शौचालयांची दुरुस्ती अद्याप केलेली नाही. काही शौचालयांना दरवाजेही नसून अनेक शौचालयाच्या आतून कड्या तुटलेल्या आहेत. तर बाजूच्या सर्व परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. आधी ग्रामपंचायत आणि आता नगरपंचायतीकडून शौचालयाकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. शौचालयाच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी प्रचंड कचरा साठलेला आहे.या घाणीमुळे आणि दुर्गंधीमुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाली नगरपंचायत हद्दीतील सर्व सार्वजनिक शौचालय लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

पाली ग्रामपंचायत हद्दीतील आगर आळीआणि इतर हद्दीमधील सार्वजनिक शौचालये नादुरुस्त आहेत. याचा येथे राहणार्‍या रहिवाशांना आणि महिलांना जास्त त्रास होतो. त्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे.पाली नगरपंचायतींकडे याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही
– प्रकाश पालकर, उपाध्यक्ष, सुधागड वंचित सामाजिक विकास संस्था

First Published on: March 25, 2022 8:53 PM
Exit mobile version