मुरुड येथे स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिर

मुरुड येथे स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिर

मुरुड: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या, समाधान शिबिराचे आयोजनाबत मुरुड जंजिराचे तहसीलदार रोहन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत तालुक्यातील सर्व शासकीय अधिकार्‍यांची उपस्थित होते. यावेळी सभा अध्यक्ष तथा तहसीलदार शिंदे यांनी सर्व शासकीय अधिकारी यांना पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त बुधवारी, २४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिर दरबार हॉल पंचायत समिती मुरुड येथे आयोजित केले असून सर्व शासकीय विभागाचे स्टॉल्सचे आयोजन त्या ठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच यावेळी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून शासनाच्या सर्व योजनांची माहिती देणार आहेत, महिलांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे असणार्‍या तक्रारींचे निरसन करण्यात येणार आहे. तरी मुरुड तालुक्यातील सर्व महिलांनी आपल्या असणार्‍या तक्रारींचे अर्ज भरून त्या त्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे या बैठकीत सांगण्यात आले.
त्याच प्रमाणे येत्या ३१मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत शेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमात सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस,मिनी अंगणवाडी सेविका,ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामसेवक,तलाठी आशा सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी,पंचायत समिती कार्यालय अंतर्गत सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून योजनांची माहिती देणार आहेत. यामधे मुरुड नगरपरिषद मधील सर्व शासकीय अधिकारी सर्व योजनांची माहिती देतील, असे या बैठकीत सांगण्यात आले.

First Published on: May 23, 2023 9:33 PM
Exit mobile version