Narali Purnima 2020 Recipes: नारळी पौर्णिमेनिमित्त बनवा ‘या’ खास रेसिपी

Narali Purnima 2020 Recipes: नारळी पौर्णिमेनिमित्त बनवा ‘या’ खास रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त बनवा 'या' खास रेसिपी

महाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. यादिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करुन नारळी पौर्णिमा साजरी करतात. त्यामुळे यादिवशी नारळाला फार महत्त्व असते. त्याचप्रमाणे यादिवशी गोडाधोडाचे पदार्थ देखील केले जातात. विशेष करुन नारळापासून खास पदार्थ तयार केले जातात. त्यातील काही खास रेसिपी आज आपण पाहणा आहोत.

नारळी भात

साहित्य

दोन वाटी बासमती तांदूळ, ४ वाटी पाणी, ४ छोटे चमचा साजूक तूप, २-३ लवंग, वेलची पूड, २ वाटी किसलेला गूळ, २ वाटी खोवलेलं ओलं नारळ, ८-१० काजू, १/२ वाटी बेदाणे, केशर काड्या आणि थोडा केशरी रंग.

कृती

भातासाठी लागणारे तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून लवंग परतून तांदूळ टाकून दोन-तीन मिनिटं परतावेत. तांदूळ परतल्यावर पाणी गरम करून त्यात टाकावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवत ठेवावा. भात शिजल्यावर हलक्या हातानं परातीत पसरवून गार करावा. भातात नारळ, गूळ, वेलची पूड, केशरी रंग हलक्या हातानं मिक्स करावा. पातेल्यात तूप तापवून काजू, बेदाणे परतावेत. परतून झाल्यावर ते वाटीत काढून ठेवावेत. तुपात मंद आचेवर भाताचं मिश्रण घालावं. झाकण ठेवून चार-पाच वाफा काढाव्यात. मधून मधून भात हालवावा. १०-१५ मिनिटांनी तळलेले काजू-बेदाणे, केशर वरती पसरवून गॅस बंद करावा.

नारळाची बर्फी

साहित्य

कृती

खोबरे प्रथम भाजून कोरडे करून घ्या. नंतर रवा तुपावर गरम करून खोबरे चांगले भाजून घ्यावे. त्यानंतर साखर भिजेल इतके पाणी घालून पाक तयार करून घ्यावा. पाक तयार करताना वाटीत पाणी घेऊन पाक टाकून बघा. तळाशी गेल्यावर गोळी तयार झाली की पाक तयार झाला, असे समजा. पाक उतरवून थोडे चमचा भर दूध टाका, पाक कधी बिघडणार नाही. गॅस बंद करून रवा मिश्रण एकजीव करून ढवळा. त्यानंतर मिश्रण घट्ट होत जाते घट्ट झाले की ताटाला तूप लावून त्यावर मिश्रण ओता. थापून त्याच्या वड्या पाडा. १ तास बाजूला ठेवून द्या. बर्फी खाण्यासाठी तय्यार आहे.

नारळाचे लाडू

साहित्य

कृती

सर्वप्रथम एका भाड्यात सुक खोबर परतून घ्या. हे खोबर जास्त भाजायचे नाही. त्यानंतर त्यात हळू हळू कंडेन्स मिल्क घाला आणि पुन्हा एकदा ते चांगले परतून घ्या. यामुळे मिश्रणाचा गोळा तयार होईल. त्यानंतर हाताला थोडेसे तूप लावून लाडू वळून घ्या. नंतर हे तयार झालेले लाडू सुक्या खोबऱ्यात घोळवून घ्या. अशाप्रकारे तुमचे तोंडात विरघळणार खोबऱ्याचे लाडू तयार.

First Published on: August 3, 2020 9:12 AM
Exit mobile version