निवृत्तीनंतरही ‘हा’ खेळाडू करणार कमबॅक !

निवृत्तीनंतरही ‘हा’ खेळाडू करणार कमबॅक !

ab de villiers gets a deadline for his international comeback

चोकर्स म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अनेक विजयी खेळ्या करून यश मिळवून देणारा एक मोठा खेळाडून निवृत्तीनंतरही संघात कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. आपल्या कामगिरीचा देशाला काहीतरी फायदा होईल याच उद्देशाने त्याने निवृत्तीचा निर्णय बदलला आहे. काही सामन्यांसाठी तो दक्षिण आफ्रिकेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा संघासाठी उपलब्ध असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा महान बॅट्समन एबी डिव्हिलयर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०१८ मध्ये निवृत्ती घेतली होती. या तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे त्याचे जगभरातले क्रिकेट चाहते निराश झाले होते. मात्र एबी डिव्हिलयर्स आता पुन्हा एकदा आयसीसी टी-२० विश्वचषक २०२० च्या आतंराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१ जून पर्यंत अंतिम मुदत जाहीर

दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरने सर्व खेळाडूंना संघात स्थान निश्चित करण्यासाठी डेडलाईन दिली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया येथे होणार असलेल्या ब्लेमफॉन्टेन येथे स्टँडर्ड बँकेच्या प्रायोजकांच्या कार्यक्रमात बोलताना बाऊचरने डिव्हिलियर्स आणि फिरकीपटू इम्रान ताहिरच्या आव्हानासाठी १ जून पर्यंत अंतिम मुदत जाहीर केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एबी डिव्हिलयर्सने जगभरातील टी -२० लीगमध्ये सहभाग नोंदविला आहे. नुकताच तो बिग बॅश लीग २०१९-२० च्या समारोप हंगामात ब्रिस्बेन हीटकडून खेळला. शिवाय, त्याच्या वाढत्या वयानंतरही त्याच्या फलंदाजीमध्ये कुठल्याही प्रकारची घसरण नाही. एबी डिव्हिलयर्सला जगातील सर्वोत्तम टी -२० फलंदाजांपैकी एक म्हणून मानले जाते. तसेच बॅटिंग करताना ३६० डिग्रीमध्ये शॉट खेळणारा जगातला एकमेव खेळाडू म्हणून एबी डिव्हिलयर्सने त्याची ओळख निर्माण केली होती. एबी डिव्हिलयर्सचे वेगवेगळे रेकॉर्डही तो दिग्गज खेळाडू असल्याचे दाखवून देतात. आयपीएलची तयारी सुरू आहे, त्यामुळे मंडळाने खेळाडूंना यात खेळण्यास परवानगी दिली आहे असे, दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – …म्हणून हरमनप्रीतसाठी अंतिम सामन्याचा दिवस खास


 

First Published on: March 6, 2020 5:48 PM
Exit mobile version