बीसीसीआयकडून सर्व स्थानिक स्पर्धा रद्द

बीसीसीआयकडून सर्व स्थानिक स्पर्धा रद्द

बीसीसीआय

करोना विषाणूमुळे बीसीसीआयने आपल्या सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.स्पर्धांना प्रेक्षकांची होणारी गर्दी पाहतत बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. खेळाडू आणि चाहत्यांचा विचार करून आम्ही सर्वच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत, असे बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने सांगितले आहे.पण यावेळी आयपीएलचा उल्लेख बीसीसीआयने केलेला नाही. आयपीएलबाबत कोणताही अधिकृत निर्णय अजूनही घेतलेला नाही. पण स्थानिक स्पर्धा मात्र रद्द करण्यात आल्या आहेत.

बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने याबाबत माहिती दिली आहे. करोना विषाणूमुळे आम्ही आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल २९ मार्चला सुरू न होता १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. पण जर करोना विषाणूचा प्रभाव कायम राहीला आणि १५ एप्रिलला जर आयपीएल सुरू होऊ शकली नाही तर मोठा धक्का बसू शकतो. कारण जर १५ एप्रिलला आयपीएल सुरू झाली नाही तर आम्हाला ती रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागेल,असे या अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे.करोना विषाणूमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेबरोबरची मालिका शुक्रवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

…तरच आयपीएलही रद्द

आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत जर करोना विषाणूचा प्रसार थांबला नाही, तर आयपीएलही रद्द करण्यात येऊ शकते. पण सध्याच्या घडीला इराणी ट्रॉफी आणि विजय हजारे करंडक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शुक्रवारी रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरीत खेळवण्यात आली. यावेळी सौराष्ट्रने जेतेपद पटकावले. पण आता या स्पर्धेनंतर एकही स्पर्धा सध्या तरी न भरवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे. त्यामुळे आजपासून बीसीसीआयच्या अंतर्गत कोणत्याही स्थानिक स्पर्धा खेळवण्यात येणार नाहीत.

First Published on: March 15, 2020 6:00 AM
Exit mobile version