भारतीय क्रिकेट संघाचा आणखी एक खेळाडू अडकणार लग्नबंधनात

भारतीय क्रिकेट संघाचा आणखी एक खेळाडू अडकणार लग्नबंधनात

भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. विजय शंकरचा नुकताच साखरपुडा पार पडला. २९ वर्षीय विजयने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले असून आपल्या चाहत्यांना चांगली बातमी दिली आहे. यानंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विजय शंकरच्या होणाऱ्या पत्नीचे नाव वैशाली विश्वेश्वरन असे आहे.

विजय शंकरच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर त्याच्या सहकारी क्रिकेटपटूंनी त्याचे अभिनंदन केले आहे. चाहत्यांनी तर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादने (एसआरएच) देखील त्यांचे अभिनंदन केले आहे. विजय शंकरने होणारी पत्नी वैशाली विश्वेश्वरनबरोबर मंगळवारी इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. केएल राहुल, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, करुण नायर, आर. अश्विन, सिद्धार्थ कौल यांनी अभिनंदन केले आहे.

💍 PC – @ne_pictures_wedding

A post shared by Vijay Shankar (@vijay_41) on

तामिळनाडूचा क्रिकेटर विजय शंकरने मार्च २०१८ मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरूद्ध टी-२० मध्ये पदार्पण केले होते. यानंतर, जानेवारी २०१९ मध्ये त्याने मेलबर्नमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विजय शंकर एकदिवसीय विश्वचषक २०१९ मध्ये टीम इंडियाचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे त्याला मधूनच संघातून माघार घ्यावी लागली. वर्ल्ड कप संघात अंबाती रायडूच्या ऐवजी त्याला प्राधान्य देण्यात आले होते, यावरुन जोरदार टीका केली जात होती.

 

First Published on: August 21, 2020 5:05 PM
Exit mobile version