कोरोनामुळे क्रिकेटमधील ‘ही’ पद्धत बंद होणार!

कोरोनामुळे क्रिकेटमधील ‘ही’ पद्धत बंद होणार!

प्रातिनिधीक फोटो

चेंडूला थूंकी लावून चमक कायम राखण्याची क्रिकेटमध्ये पध्दत आहे. मात्र आता लवकरच ही पध्दत आता बंद होणार असं दिसतय. अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षेतेखाली ICCच्या क्रिकेट समितीने कोरोनाच्या भीतीमुळे चेंडूला थुंकी लावण्याची पद्धत बंद करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबच चेंडूला घामाचा वापर करण्याबाबत कोणताही धोका दिसत नसल्याचे मत क्रिकेट समितीने दिले आहे.

सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून क्रिकेट समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. यावर अनेक प्रस्तावही मांडण्यात आले. या बैठकीत क्रिकेट मालिकेसाठी केवळ यजमान देशाचेच पंच अंपायरिंग करण्याचा प्रस्ताव देखील ठेवण्यात आला. आतापर्यंत क्रिकेट मालिकेसाठी तटस्थ पंच किंवा दोन संघाच्या देशाचे पंच काम पाहात होते, पण आता यापुढे केवळ यजमान देशाचेच पंच अंपायरिंग करताना दिसण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे नियमात बदल करण्याचा प्रस्ताव

कोरोनाच्या काळात सुरक्षितपणे क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अनेक प्रस्ताव ठेवण्यात आले. ICC च्या वैद्यकीय सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. पीटर हारकोर्ट यांनी करोनाचा प्रसार लाळेवाटे किंवा थुंकीवाटे होण्याची शक्यता आहे अशी माहिती दिली. त्यामुळे क्रिकेट समितीतील सर्वांनी एकमताने चेंडूवर थुंकी लावण्याची पद्धत बंद करण्याची शिफारस केली आहे. चेंडूवर घाम लावल्याने करोना संक्रमण किंवा प्रसाराचा कोणताही धोका नसल्याचेही वैद्यकीय समितीने सांगितले आहे. त्यामुळे गोलंदाज घामाचा वापर करून चेंडूची चमक कायम ठेवू शकतात”, अशी माहिती अनिल कुंबळे यांनी ICC ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाच्या माध्यमातून दिली.


हे ही वाचा – कोरोना रोखण्यासाठी लस विकसित, अमेरिकेत पहिली मानवी चाचणी यशस्वी!


 

First Published on: May 19, 2020 11:45 AM
Exit mobile version