FIFA 2018 : क्रोएशियाचा अर्जेंटिनावर विजय, मेस्सी ठरला निष्प्रभ

FIFA 2018 : क्रोएशियाचा अर्जेंटिनावर विजय, मेस्सी ठरला निष्प्रभ

अर्जेंटिनाविरूद्ध क्रोएशिया सामन्यातील एक चुरशीचा क्षण

जागतिक फुटबॉलमधील स्टार खेळाडू लिओनल मेस्सीच्या अर्जेंटिना संघांचा गुरूवारी रात्री झालेल्या सामन्यात क्रोएशियाने धक्कादायक पराभव केला आहे. ३-० च्या फरकाने विजय मिळवत क्रोएशियाने डी गटात अव्वल स्थान मिळवले आहे.

फिफाच्या विश्वचषकातील डी गटात अर्जेंटिनाविरूद्ध क्रोएशिया सामना रंगला. सुरूवातीच्या काही मिनिटात अर्जेंटिनाकडून चांगली आक्रमणां करण्यात आली. मात्र क्रोएशियाकडून चांगल्या प्रकारचा डिफेन्समुळे अर्जेंटिनाला एकही गोल करता आला नाही. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघाचा स्कोर ०-० होता. मात्र उत्तरार्धात ५३व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या गोलकिपरकडून बॉल टाकताना चुक झाली आणि त्याचा फायदा घेत क्रोएशियाच्या रेबिचने पहिला गोल करत संघांला आघाडी मिळवून दिली.

क्रोएशिया संघांचा खेळाडू रेबिच आनंद साजरा करताना

त्यानंतर ८० व्या मिनिटाला क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिचकडून अप्रतिम गोल करण्यात आला आणि क्रोएशियाने सामन्यात २- ० अशी आघाडी घेतली. या गोलनंतर क्रोएशियाचे सामन्यावर वर्चस्व दिसून आले. क्रोएशियाच्या इवान राकिटिकने ९१ व्या मिनिटाला गोल करत क्रोएशियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आनंद साजरा करताना क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिच

मेस्सीवर टीकांचा वर्षाव

सर्व फुटबॉल जगताची नजर असणाऱ्या लिओनल मेस्सीकडून सामन्यात काही खास कामगिरी झालेली दिसली नाही. गोल करण्याचे काही चान्स मेस्सीला मिळाले देखील मात्र मेस्सी त्यांचे गोलमध्ये रूपांतर करू शकला नाही. यामुळे जगभरातून मेस्सीवर टीकांचा वर्षाव होत असूनही त्याचे काही चाहते त्याच्या बाजूने बोलताना दिसत आहे. त्यांच्या मते फुटबॉल एक सांघिक खेळ असून पराभवाचा दोष एका खेळाडूवर देणे चुकीचे आहे.

लिओनल मेस्सी

गेल्या कित्येक वर्षात साखळी सामन्यांच्या फेरीत अर्जेंटिनाचा इतका मोठा पराभव झाला नव्हता. सध्या डी गटात क्रोएशिया अव्वलस्थानी असून पहिला सामना अनिर्णित आणि दुसऱ्या सामन्यातील पराभवामुळे अर्जेंटिनाच्या खात्यात केवळ एक गुण आहे. ज्यामुळे अर्जेंटिनाचा या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

First Published on: June 22, 2018 12:43 PM
Exit mobile version