Asia Cup – Ind vs Hkg Live Updates : हाँगकाँगची दमदार सुरूवात, बिनबाद १५२
My Mahanagar Team
नझाकत खानसोबतच अंशुमन राठीनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
हाँगकाँगचे सलामीवीर नझाकत खान आणि अंशुमन राठ यांनी अप्रतिम सुरुवात केली आहे. नझाकत खानने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
भारतातर्फे शिखर धवनने सर्वाधिक १२७ धावा केल्या. त्याला रायडूने ६० धावा करत चांगली साथ दिली. हाँगकाँगकडून किंचित शाह याने ३ विकेट घेतल्या.
शिखर धवन बाद झाल्यानंतर भारताच्या इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे भारताला २८५ धावांपर्यंतच मजल मारता आली.
शिखर धवन (१२७) आणि धोनी (०) पाठोपाठ माघारी परतले आहेत. आता भारताच्या डावाची भिस्त कार्तिक आणि केदार जाधववर आहे.
शिखर धवनने आपल्या कारकिर्दीतील १४ वे शतक झळकावले आहे. त्यामुळे भारताचे द्विशतक पूर्ण झाले आहे.
आशिया चषकात पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायडूने अर्धशतक केले. पण ६० धावांवर त्याला एहसान नवाझने बाद केले.
रोहितची विकेट लवकर गमावल्यानंतर धवन आणि रायडू यांनी भारताचा डाव सावरला आहे. या दोघांनीही आपले अर्धशतक पूर्ण केले.
भारताची चांगली सुरुवात झाली पण कर्णधार रोहित शर्मा २३ धावांवर बाद झाला.
भारत आणि हाँग काँगमधील सामन्यात हाँग काँगने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदला पदार्पणाची संधी दिली आहे.