Asian Games 2018 : नेमबाजपटू लक्ष्य शेरॉनने पटकावले रौप्यपदक

Asian Games 2018 : नेमबाजपटू लक्ष्य शेरॉनने पटकावले रौप्यपदक

लक्ष्य शेरॉन

एशियन गेम्समध्ये भारताचा २० वर्षीय नेमबाजपटू लक्ष्य शेरॉनने पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात रौप्यपदक मिळवले आहे.
इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे सुरू असलेल्या १८ व्या आशियाई खेळांत भारताचा नेमबाजपटू लक्ष्य शेरॉनने अप्रतिम कामगिरी केली असून रौप्यपदकाला गवासणी घातली आहे. अवघ्या ५ गुणांनी तो सुवर्णपदकाला हुकला असला तरी त्याने २० वर्षाच्या वयात आशियाई रौप्यपदक जिंकत माजी नेमबाजपटू मानवजीत सिंग संधूच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताचे माजी नेमबाजपटू मानवजीत सिंग संधू यांनी २००६ साली भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते.


पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात लक्ष्यने ४३ गुण मिळवत रौप्यपदक पटकावले आहे. तर चायनीज तैपईच्या कुन्पी यांग याने ४८ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. दक्षिण कोरियाच्या देमयांग अहनने ३० गुणांसह कांस्यपदक आपले नावे केले आहे.

First Published on: August 21, 2018 8:41 AM
Exit mobile version