हिमा आसामची ‘स्पोर्ट अॅम्बेसेडर’

हिमा आसामची ‘स्पोर्ट अॅम्बेसेडर’

हिमा दास

हिमा दासने फिनलँडमध्ये पार पडलेल्या अंडर २० ‘जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’ स्पर्धेत भारताला ४०० मीटर शर्यतीत ५१.४६ सेकंदात ४०० मीटर अंतर कापत एका नव्या विक्रमाची नोंद केली. तिच्या या कामगिरीमुळे देशातील सर्व स्थरातून तिचे कौतुक केले जात आहे. याचवेळी तिचे राज्य असलेल्या आसाममधून तिला स्पोर्ट्स अॅम्बेसेडर करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आसाम राज्य सरकारकडून ही घोषणा केली गेली आहे.

हिमाने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ‘ट्रॅक इव्हेंट’मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले १२ जुलैला म्हणजेच गुरवारी हिमाने हे सुवर्णपदक जिंकले आहे. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी हिमाच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि तिथेच हिमाला राज्याची ‘स्पोर्ट्स अॅम्बेसेडर’ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यानी ही घोषणा केल्यानंतर हिमाच्या घरच्यांना अक्षरश: गहिवरून आले होते.


एका सामान्य घरातून आलेल्या हिमाने भारताला मिळवून दिलेल्या सुवर्णपदकामुळे तिचे अगदी पंतप्रधान मोदीपासून ते बीगबी बच्चनपर्यंत सर्वांनीच अभिनंदन केले आहे. याचसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग,रोहित शर्मा पी. टी. उषा,गृहमंत्री राजनाथ सिंह आणि ममता बॅनर्जी यानी हिमाचे सोशल मीडियावर अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

First Published on: July 18, 2018 5:32 PM
Exit mobile version