ICC Women’s World cup 2022 : ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडला पराभूत करून पॉईंट टेबलमध्ये टॉपला

ICC Women’s World cup 2022 : ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडला पराभूत करून पॉईंट टेबलमध्ये टॉपला

वेलिंग्टन येथे खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपच्या ११ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला १४१ धावांनी पराभूत केले. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्या टॉस हरल्यावर न्यूझीलंडला २७० धावांचे लक्ष्ये ठेवले. पण ऑस्ट्रेलियन धारधार गोलंदाजीपुढे संपूर्ण न्यूझीलंडचा संघ हा १२८ धावा बनवत ऑलआऊट झाला.

ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राऊनने ३ तर एमांडा वेलिंगटनने आणि एश्ले गार्डनरने प्रत्येकी २ खेळाडू बाद केले. न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा या एमी सैथर्टवेटने केल्या. सैथर्टवेटने ६७ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत ५० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून २६९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून दोन अर्धशतके करण्यात आली. ई पेरीने सर्वाधित ६८ धावा केल्या. तर ताहिला मैग्राने ५७ धावांची खेळी केली. त्याशिवाय गार्डनरने १८ चेंडूत ४८ धावांची स्फोटक खेळी केली.

वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा लागोपाठ तिसरा विजय आहे. तर न्यूझीलंडच्या ४ सामन्यांपैकी हा दुसरा पराभव आहे. या पराभवामुळे न्यूझीलंड टीम पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर गेली आहे. पण सेमी फायनलच्या स्पर्धेत अजुनही हा संघ कायम आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी पहिल्या सामन्यात इंग्लंडला १२ धावा आणि दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानला ७ विकेट्सने हरवले होते.

न्यूझीलंडच्या संघाला याआधी वेस्ट इंडिज संघाकडून ३ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशविरोधात ९ विकेट्सने तर भारताविरोधात ६२ धावांनी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना १५ मार्चला वेस्ट इंडिजविरोधात तर न्यूझीलंडचा सामना १७ मार्चला दक्षिण आफ्रिकेसोबत आहे.


 

First Published on: March 13, 2022 4:42 PM
Exit mobile version