IND vs AUS: ‘Boxing Day’ कसोटीसाठी ‘ही’ आहे प्लेईंग इलेव्हन

IND vs AUS: ‘Boxing Day’ कसोटीसाठी ‘ही’ आहे प्लेईंग इलेव्हन

BCCI ने भारतीय क्रिकेट संघात कोणाकोणाला स्थान द्यायचं हे ठरवणाऱ्या निवड समितीची घोषणा केली आहे. ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया उद्या मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर सुरू असलेल्या चर्चेनुसार भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहे.

पहिल्या सामन्यात झालेला पराभवानंतर हा सामना जिंकण्याचं आव्हान घेऊन अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम मैदानात उतरणार आहे. बीसीसीआयने एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली असून पहिल्या कसोटीत सुमार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी शुभमन गिलचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारताकडून खेळल्या जाणाऱ्या कसोटीत शुभमन गिल पदार्पण करणार आहे. तर वृद्धीमान साहाच्या ऐवजी ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. यासह अष्टपैलू रविंद्र जडेजालाही भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. तर दुखापतीमुळे संघा बाहेर गेलेल्या मोहम्मद शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली असून सिराज देखील गिल प्रमाणेच कसोटीत पदार्पण करणार आहे.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन

अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

विराट कोहली, मोहम्मद शामीच्या अनुपस्थिती भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं खडतर आवाहन आहे. मेलबर्न येथे २६ डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला सुरूवात होणार असून या लढतीसाठी भारतीय संघात अनेक बदल अपेक्षित आहेत. अ‍ॅडलेड येथील पहिल्या कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला.

First Published on: December 25, 2020 1:25 PM
Exit mobile version