बीसीसीआयच्या देणगीचा विंडीज बोर्डाकडून गैरवापर

बीसीसीआयच्या देणगीचा विंडीज बोर्डाकडून गैरवापर

वेस्ट इंडिजचे महान वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग नेहमीच आपली मते स्पष्टपणे मांडतात. ते कोणाचीही चूक दाखवून द्यायला घाबरत नाहीत. आता होल्डिंग यांनी क्रिकेट वेस्ट इंडिजवर काही आरोप केले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणार्‍या बीसीसीआयने क्रिकेट वेस्ट इंडिजला काही वर्षांपूर्वी विंडीजच्या माजी खेळाडूंसाठी ५ लाख मिलियन अमेरिकन डॉलर्सची देणगी दिली होती. मात्र, क्रिकेट वेस्ट इंडिजने या देणगीचा गैरवापर केला असा आरोप होल्डिंग यांनी केला आहे.

२०१३-१४ मध्ये बीसीसीआयने क्रिकेट वेस्ट इंडिजला ५ लाख मिलियन अमेरिकन डॉलर्सची देणगी दिली होती. ही रक्कम विंडीजच्या माजी खेळाडूंच्या हितासाठी देण्यात आली होती. मी माजी खेळाडू आहे. मात्र, मला काहीही मिळाले नाही. मला गरजही नाही. परंतु, मी विंडीजच्या बर्‍याच माजी खेळाडूंच्या सतत संपर्कात असतो. यापैकी एकालाही काही रक्कम मिळालेली नाही. क्रिकेट वेस्ट इंडिजने जर माजी खेळाडूंना मदत केली असती, तर त्याचा गाजावाजा केला असता याची मला खात्री आहे. मात्र, तसे झाले नाही, कारण कोणाला मदतच मिळालेली नाही. मग ते ५ लाख मिलियन अमेरिकन डॉलर्स गेले कुठे? मी लवकरच याचा खुलासा करीन, असे होल्डिंग म्हणाले.

First Published on: May 21, 2020 4:03 AM
Exit mobile version