BCCI अध्यक्ष सौरव गांगुली होम क्वारंटाइन; भावाला कोरोनाची लागण

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली होम क्वारंटाइन; भावाला कोरोनाची लागण

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे सौरव गांगुली यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. स्नेहाशीष गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेचे सहाय्यक सचिव आहेत. त्यांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर सौरव गांगुली यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाइन करून घेतलं आहे.

कोरोनाची लागण झाल्याचं समजताच स्नेहाशिष यांना बेले व्यू या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेले काही दिवस स्नेहाशिष यांना ताप येत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल बुधवारी संध्याकाळी उशिरा आला. आरोग्यविभागाने जारी केलेल्या नियमांनुसार सौरव गांगुलीलाही काही कालावधीसाठी घरात क्वारंटाइन व्हावं लागणार आहे, अशी माहिती बंगाल क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.

First Published on: July 16, 2020 1:02 PM
Exit mobile version