श्रीमंत आयपीएलची गरीबी, विजेत्यांची रक्कम केली निम्याने कमी

श्रीमंत आयपीएलची गरीबी, विजेत्यांची रक्कम केली निम्याने कमी

इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२० च्या सत्राची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र यावर्षी आयपीएलच्या आगामी हंगामाला कॉस्ट कटिंगचा फटका बसला आहे. बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने आगामी हंगामात विजेत्या रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्व संघमालकांना कल्पना देण्यात आली असून, या हंगामात विजेत्या संघाला २० एवजी १० कोटीचे बक्षीस रक्कम मिळणार आहे.

आयपीएलमध्ये कॉस्ट कटिंगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. २०१९ च्या विजेत्या संघाला २० कोटी देण्यात आले होते. मात्र यंदा विजेत्या संघाला १० कोटी इतकी रक्कम देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला १२.५ कोटी एवजी ६.२५ कोटी देण्यात येणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयने पीटीआयला दिली आहे. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला यंदाच्या हंगामात ४.३ कोटी रुपये मिळणार आहेत. याचसोबत ज्या मैदानावर आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे, त्या राज्य क्रिकेट संघटनेला १ कोटी रुपयांचं मानधन मिळणार आहे, ज्यातील ५० लाख बीसीसीआय देणार आहे.

बीसीसीआयच्या कर्मचाऱ्यांना आता बिझनेस क्लासमधून विमान प्रवास करता येणार नाही. तसेच स्पर्धेच्या मध्यंतरानंतर होणाऱ्या खेळाडूंच्या आदला-बदलीच्या नियमातही बदल केला गेला आहे. यापूर्वी केवळ अनकॅप म्हणजे आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या खेळाडूची संघ आदला-बदली करत होते. मात्र आता आंतरराष्ट्रीय आणि परदेशी खेळाडूंचीही आदला-बदली करता येऊ शकते. आयपीएलवर कोणतेही आर्थिक मंदीचे सावट नाहीये, फ्रँचायझींचीही आर्थिक परिस्थिती चांगली आहे. प्रायोजकासह अन्य मार्गातून ते कमावत आहेत तरीही बक्षीस रकमेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

First Published on: March 4, 2020 3:56 PM
Exit mobile version