BCCI महिला क्रिकेटच्या वार्षिक कराराची घोषणा, 5 खेळाडूंना वगळले

BCCI महिला क्रिकेटच्या वार्षिक कराराची घोषणा, 5 खेळाडूंना वगळले

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज (27 एप्रिल) महिला क्रिकेटरच्या (Woman Cricketer) वार्षिक (2022-23) करार घोषणा केली आहे. या नव्या केंद्रीय करारानुसार 17 खेळाडूंना यादीत स्थान देण्यात आले आहे. नव्या करारानुसार ए, बी आणि सी या तीन ग्रेडमध्ये महिला खेळाडूंची विभागणी करण्यात आली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरशिवाय बीसीसीआयने स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा या दोन खेळाडूंना ए ग्रेडमध्ये समावेश केला आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या करारानुसार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि दीप्ती शर्मा (Deepti Sharma) या महिला क्रिकेटपटूंना वार्षिक 50 लाख रुपये मिळणार आहेत. यानंतर ५ खेळाडूंना ब श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर, फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड, सलामीवीर शेफाली वर्मा, रिचा घोष आणी जेमिमा रॉड्रिग्स यांचा समावेश करण्यात आला आहे. बी श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआयकडून वार्षिक 30 लाख रुपये मिळतील.

ग्रेड C मध्ये 9 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये मेघना सिंग, देविका वैद्य, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, सबिनेनी मेघना, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल आणि यास्तिका भाटिया यांचा समावेश आहे. या खेळाडूंना वार्षिक 10 लाख रुपये मिळणार आहेत.

या खेळाडूंना करारात स्थान नाही
नव्या करारानुसार पूनम यादव, तान्या भाटिया, पूनम राऊत, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी या महिला खेळाडूंना यावर्षी कोणत्याही श्रेणीमध्ये स्थान मिळालेले नाही. याशिवाय गेल्या वर्षीच्या करारानुसार राजेश्वरी गायकवाड हिची अ श्रेणीतून ब श्रेणीत बदली करण्यात आली आहे, तर पूजा वस्त्राकर हिची ब श्रेणीतून क श्रेणीत बदली करण्यात आली आहे. नव्या करारामध्ये ७ खेळाडूंना प्रथम स्थान मिळाले आहे. ज्यात रेणुका ठाकूर, मेघना सिंग, देविका, सबिनेनी मेघना, अंजली सरवानी, राधा यादव, यास्तिका भाटिया यांचा समावेश आहे.

पुरुष आणि महिला क्रिकेटच्या वार्षिक करारात मोठा फरक
बीसीसीआयने 26 मार्च 2023 रोजी पुरुष क्रिकेटच्या खेळाडूंसोबत 2022-2023 साठी वार्षिक करार जाहीर केला होता. या करारात 26 खेळाडूंना स्थान मिळाले होते. पुरुष खेळाडूंप्रमाणेच महिला खेळाडूंसोबतही सारखाच करार केला जाईल, असा ऐतिहासिक निर्णय बीसीसीआयने घेतला होता. मात्र पुरुष खेळाडूंप्रमाणे महिला खेळाडूंना कमी मानधन दिले जात असल्याचे समोर आले आहे. प्रथम श्रेणीतील पुरुष क्रिकेटपटूंना एका वर्षासाठी ७ कोटी रुपयाप्रमाणे अ श्रेणीसाठी ५ कोटी, ब श्रेणीसाठी ३ कोटी आणि क श्रेणीतील १ कोटी रुपये मिळतील, मात्र महिला खेळाडूंना प्रथम श्रेणीसाठी 50 लाख रुपयांपासून सुरूवात होते.

First Published on: April 27, 2023 2:54 PM
Exit mobile version