फिफाचा जल्लोष जिवावर बेतला; वाइनच्या ग्लासवर पडून महिलेचा मृत्यू

फिफाचा जल्लोष जिवावर बेतला; वाइनच्या ग्लासवर पडून महिलेचा मृत्यू

फोटो सौजण्य- फोटो ऑनलाईन

फिफा वर्ल्डकपमध्ये ब्राझीलने सर्बियाविरूद्ध विजय मिळवत थेट बाद फेरी गाठली. याचा आनंद सर्व ब्राझीलियन्सनी धमाकेदार सेलिब्रेशन करत साजरा केला. मात्र या आनंदाला कुठेतरी गालबोट लागल्याची घटना ब्राझीलच्या साओ पावलो येथे घडली आहे. तामरा मायोची या ३० वर्षीय महिलेने वाइनचा घोट घेतला आणि तो तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. ब्राझीलच्या विजयाचा आनंद साजरा करत असताना तामरा वाइनच्या ग्लासवर पडली आणि काचेच्या तुकड्यांमुळे तिची रक्तवाहिनी कापली गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

नेमकी घटना काय आहे?

ब्राझीलच्या दक्षिण-पूर्व भागातील साओ पावलोमध्ये राहणारी तामरा मायोची ही ३० वर्षीय महिला आपल्या मित्रांसोबत ब्राझीलविरूद्ध सर्बिया ही मॅच पहात होती. ती सोफ्यावर हातात मोबाईल आणि वाइनचा ग्लास घेऊन बसली होती. मॅच संपताच रेफरीने शिट्टी वाजवली आणि ब्राझीलचा विजय झाल्याचं जाहीर झालं. हा विजय आपल्या मित्रांसोबत साजरा करण्यासाठी तामरा टेबलवर उभी राहिली. पण अचानक तिचा तोल गेला आणि घसरून ती वाईनच्या ग्लासवर पडली. ग्लासच्या काचेच्या तुकड्याने तिच्या गळ्यातील रक्तवाहिनी कापली गेली. तिच्या मित्रांनी टॉवेलने रक्त थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र आपातकालीन सेवा पोहोचेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

ब्राझीलविरूद्ध सर्बिया सामन्यातील एक क्षण

तिची शेवटची पोस्ट

तामरा मायोची हिने मरण्याआधी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि ही पोस्ट तिची शेवटची पोस्ट ठरली. ही पोस्ट ‘गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर टाळा’ अशा आशयाची होती. तिने लिहिले होते की “आपल्या सोबत कधी काय होईल याची आपण कल्पनाही करू शकत नाही, अपघात न सांगता घडतात. त्यामुळे आपण सतर्क रहायला हवे.”

First Published on: July 1, 2018 4:17 PM
Exit mobile version