चेन्नई करणार पहिल्या सामन्याची कमाई शहिदांच्या कुटुंबीयांना दान

चेन्नई करणार पहिल्या सामन्याची कमाई शहिदांच्या कुटुंबीयांना दान

Chennai Super Kings

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १२ व्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. या सामन्याचे उत्पन्न पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय चेन्नई सुपर किंग्जने घेतला आहे. कर्णधार धोनीच्या हस्ते रकमेचा धनादेश दिला जाईल.

गतविजेता संघ चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील या स्पर्धेची पहिली लढत ही चेन्नईच्या चिदंबरम मैदानावर होणार आहे. या सामन्याची कमाई पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना दिली जाईल. आयपीएलच्या सामन्याच्या तिकिटातून मिळालेले पैसे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येतील. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते रकमेचा धनादेश सुपुर्द केला जाईल, अशी माहिती संघाचे संचालक राकेश सिंह यांनी दिली. या सामन्याची तिकिटे ही पहिल्या दिवशी काही तासांतच विकली गेली.

First Published on: March 22, 2019 4:10 AM
Exit mobile version