पराभव लागला जिव्हारी; गीता आणि बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

पराभव लागला जिव्हारी; गीता आणि बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

पराभव लागला जिव्हारी; गीता आणि बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

भारतीय कुस्तीपटू गीता आणि बबिता फोगटच्या मामेबहिण रितिका फोगटने आत्महत्या केली आहे. राज्यस्तरी कुस्ती स्पर्धेत एका पॉईंटने पराभव झाल्यानं रितिका फोगटने आत्महत्या केली असं बोललं जात आहे. रितिकाच्या आत्महत्येनं कुस्ती क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. रितिका फक्त १७ वर्षांची होती.

राजस्थानच्या भरतपूरमध्ये सब ज्युनियर स्पर्धेत ५३ किलो वजनी गटामध्ये रितिका फोगटचा पराभव झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. १७ वर्षीय रितिकालाही फोगट बहिणींप्रमाणे कुस्तीपटू बनायचे होते. त्यासाठी ती ५ वर्षे आपले मामा महावीर फोगट यांच्या अकादमीमध्ये सराव करत होती. तिने नुकत्याच १२ ते १४ मार्च दरम्यान भरतपूरमधील लोहागढ स्टेडियममध्ये झालेल्या राज्यस्थरीय सब-ज्यूनियर आणि ज्यूनियर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. १४ मार्चला खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात फक्त एका पॉईंट्ने रितिकाचा पराभव झाला. हा पराभव रितिकाला सहन झाला नाही. त्यामुळे तिने १५ मार्चला रात्री महावीर फोगट यांच्या गावी बालाली येथील एका खोलीत गळफास घेत आत्महत्य केली.

रितिका फोगटचा मृतदेह पोस्टमार्टम केल्यानंतर नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला असून तिच्यावर अंतिम संस्कार तिच्या गावी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूरमध्ये करण्यात आलं. या प्रकरणाबद्दल डीएसपी राम सिंग यांनी सांगितलं आहे की पोस्टमार्टमनंतर तिचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे. तसंच त्यांना ती अंतिम सामन्यात पराभूत झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली असून आता या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.

 

First Published on: March 18, 2021 11:00 AM
Exit mobile version