Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दु:खचा डोंगर; नवजात मुलाचं निधन

Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दु:खचा डोंगर; नवजात मुलाचं निधन

पोर्तुगालचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर दु:खचा डोंगर कोसळला आहे. रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन झालं आहे. त्याने सोमवारी १८ एप्रिलला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. रोनाल्डो आणि त्याची पत्नी जॉर्जीना रॉड्रिगेज यांना जुळी मुलं झालं. मात्र, त्यातील मुलाचं निधन झालं.

रोनाल्डोने पोस्ट करत सांगितलं की, आम्हाला सांगताना हे अत्यंत दु:ख होत आहे की आमच्या नवजात मुलाचं निधन झालंय. कोणत्याही आई-वडिलांसाठी सर्वात मोठं दु:ख आहे. आमच्या मुलीचा जन्म आम्हाला हे दु:ख सहन करण्याची दाकद देतो.” पुढे त्याने सर्व डॉक्टर आणि नर्सेसचे आभार मानले.

रोनाल्डोने ऑक्टोबरमध्ये पत्नी जॉर्जिनासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करुन लवकरच ते आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. त्यांनी जुळ्या मुलांबाबत पोस्ट शेअर करुन सर्व चाहत्यांना एक गुड न्यूज दिली होती. तथापि, रोनाल्डोला ११ वर्षांचा ख्रिस्तियानो ज्युनियर मुलगा, चार वर्षांची इव्हा आणि मटाओ ही जुळी मुलं तर तीन वर्षांची अलाना मार्टिन अशी चार मुलं आहेत.

First Published on: April 19, 2022 8:30 AM
Exit mobile version