Denmark Open : लिन डॅनला नमवत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

Denmark Open : लिन डॅनला नमवत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

किदाम्बी श्रीकांत

भारताच्या किदाम्बी श्रीकांतने चीनच्या लिन डॅनला नमवत डेन्मार्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात श्रीकांतने लिन डॅनचा १८-२१, २१-१७, २१-१६ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना भारताच्याच समीर वर्माशी होणार आहे.

श्रीकांतचा डॅनवर हा केवळ दुसरा विजय

लिन डॅन हा बॅडमिंटनमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. श्रीकांतचा डॅनवर हा केवळ दुसरा विजय आहे. याआधी श्रीकांत आणि डॅन यांच्यात चार सामने झालेले होते. ज्यात डॅन तीन तर श्रीकांत एक सामना जिंकला होता. डॅनने या सामन्यात चांगली सुरुवात करत पहिला सेट २१-१८ असा जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये श्रीकांतने पुनरागमन केले. त्याने हा सेट २१-१७ असा जिंकला. त्यामुळे हा सामना तिसऱ्या सेटमध्ये गेला. ज्यात श्रीकांतने अप्रतिम खेळ करत हा सेट २१-१६ असा जिंकत सामनाही जिंकला.

उपांत्यपूर्व फेरीत समीर वर्माशी सामना

श्रीकांतचा उपांत्यपूर्व फेरीत समीर वर्माशी सामना होईल. समीरने गुरूवारी एशियन गेम्स २०१८ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या जोनाथन क्रिस्टीचा २३-२१, ६-२१, २२-२० असा पराभव केला होता. या विजयामुळे समीरने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

First Published on: October 19, 2018 4:33 PM
Exit mobile version