सौरव गांगुलींचे प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना दिवाळी गिफ्ट

सौरव गांगुलींचे प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना दिवाळी गिफ्ट

सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली; छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

गेल्या आठवड्यातच भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.त्यानंतर त्याने निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे.त्यातलाच एक निर्णय म्हणजे प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंसाठीही करार करण्यासाठी गांगुली उत्सुक आहे.

या कराराअंतर्गत या खेळाडूंना वेतन किंवा शुल्क मिळणार आहे. नवी व्यवस्थेनुसार युवा खेळाडूंना वित्तीय सुरक्षा देण्याचा निर्णय गांगुलीने घेतला आहे. या निर्णयाने प्रथम श्रेणीमध्ये खेळणार्‍या क्रिकेटपटूंची आर्थिक समस्या संपुष्टात येईल, असे बोलले जात आहे.

याविषयी बोलताना ‘प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंच्याही समस्या असतात. त्यामुळे त्यांनाही आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ज्या श्रेणीमध्ये मानधन दिले जाते, तसाच प्रकारे मानधन प्रथम श्रेणीमध्ये होणार आहे.’ असे गांगुलीने म्हटले आहे. गांगुलीने या कराराची व्यवस्था वित्त समितीला करण्यास सांगितले असल्याचे कळते. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, त्यानुसार खेळाडूंनी मानधन दिले जाणार आहे.

सध्या प्रथम श्रेणीमध्ये खेळाडूंना वर्षाला २५-३० लाख रुपये मिळतात. तसेच भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी करार करण्यात आले आहेत. सध्या बीसीसीआयच्या वतीने ए प्लस, ए, बी, आणि सी असे करार केले आहेत. यानुसार खेळाडूंना मानधन दिले जाते.

First Published on: October 30, 2019 5:26 AM
Exit mobile version