US OPEN 2018: जोकोविच तिसऱ्या फेरीत

US OPEN 2018: जोकोविच तिसऱ्या फेरीत

सौजन्य - द इंडियन एक्सप्रेस

सर्बियायचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने अमेरिकन ओपनच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे. दुसऱ्या फेरीत त्याने अमेरिकेच्या टेन्यस सॅन्डग्रेन याचा ६-१, ६-३, ६-७, ६-२ असा पराभव केला.

कसा झाला सामना 

जोकोविचने या सामन्याची सुरुवात अप्रतिम केली. त्याने पहिल्या सेटमध्ये सॅन्डग्रेनची सर्विस जोकोविचने ३ वेळा मोडली. तर सॅन्डग्रेनला आपली सर्विस मोडू दिली नाही. त्यामुळे त्याने हा पहिला सेट ६-१ असा जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने सॅन्डग्रेनवर दबाव कायम ठेवला. पण तिसऱ्या सेटमध्ये सॅन्डग्रेनने चांगले पुनरागमन केले. त्याने जोकोविचला आपली सर्विस एकदाही मोडू दिली नाही. सॅन्डग्रेनने हा सेट टायब्रेकरमध्ये ७-६ असा जिंकला. पण जोकोविचने पुन्हा चौथ्या सेटमध्ये अप्रतिम खेळ करत हा सेट ६-२ असा जिंकत सामनाही जिंकला.

निशिकोरीही पुढील फेरीत

जपानचा स्टार बॅडमिंटनपटू काई निशिकोरी यानेही अमेरिकन ओपनच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे. त्याने फ्रान्सच्या गेल मॉनफिल्स याचा ६-२, ५-४ असा पराभव केला. दुसऱ्या सेटमध्ये दुखापतीमुळे मॉनफिल्सने सामन्यातून माघार घेतली. मॉनफिल्सच्या उजवा हात दुखावल्याने त्याने ही माघार घेतली.
First Published on: August 31, 2018 11:43 AM
Exit mobile version