रुनीच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंड विजयी

रुनीच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंड विजयी

वेन रुनी

इंग्लंडचा महान फुटबॉलपटू वेन रुनीने इंग्लंडसाठी अमेरिकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला. हा सामना इंग्लंडने ३-० असा जिंकला. रुनीने इंग्लंडसाठी १२० सामने खेळले. या १२० सामन्यांत त्याने ५३ गोल मारले. इंग्लंडच्या इतिहासात एका खेळाडूने मारलेले हे सर्वाधिक गोल आहेत.

अमेरिकेचा उडवला धुव्वा

वेन रूनी अखेरच्या सामन्यात सुरुवातीपासून खेळला नाही. मात्र, इंग्लंडने लुईस डंक आणि कॅलम विल्सन यांना पदार्पणाची संधी दिली. तर युवा खेळाडू जाडोन सांचो सुरुवातीपासून सामना खेळण्याची पहिलीच वेळ होती. अमेरिकेविरुद्धच्या सामन्याची सुरुवात इंग्लंडने आक्रमक केली. याचा फायदा त्यांना २५ व्या मिनिटाला झाला. त्यांचा मिडफिल्डर जेसी लिंगार्डने २५ व्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. तर २७ व्या मिनिटाला ट्रेंट अलेक्सान्डेर-अर्नोल्डने गोल करत इंग्लंडची आघाडी २-० अशी केली. हा स्कोर त्यांना मध्यंतरापर्यंत ठेवण्यात यश आले. मध्यंतरानंतरही इंग्लंडने आपले वर्चस्व कायम ठेवले. ५८ व्या मिनिटाला रुनी मैदानात उतरला. त्याने चांगला खेळ केला. पण त्याला गोल काही करता आला नाही. ७७ व्या मिनिटाला पदार्पण करणाऱ्या कॅलम विल्सनने गोल करत इंग्लंडची आघाडी ३-० अशी केली. सामना संपेपर्यंत इंग्लंडने ही आघाडी कायम ठेवत हा सामना जिंकला.

रुनीला सहकाऱ्यांचा सलाम

इंग्लंडचे १२० सामन्यांत प्रतिनिधित्व करणाऱ्या रुनीचे त्याच्या सहकार्यांनी अभिनंदन केले.
First Published on: November 16, 2018 11:21 PM
Exit mobile version