Video : चाहत्याच्या आईने केली बुमराहची नक्कल

Video : चाहत्याच्या आईने केली बुमराहची नक्कल

चाहत्याच्या आईने केली बुमराहची नक्कल

विश्वचषक २०१९ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेला भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहवर चाहत्यांनी जणू काही जीव ओवाळून टाकला आहे. त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची देशभरात चर्चा सुरू आहे. चाहत्यांकडून त्याचे प्रचंड कौतुक केले जात आहे. फक्त देशाभरातच नाही तर जगभरातील लोक त्याचे चाहते बनले. चाहत्यांकडून मिळणाऱ्या अनेक आनंदांपैकी एक मौल्यवान आनंद जसप्रीतला मिळाला आहे. तो आनंद असा की एका चाहत्याच्या आईने त्याच्या गोलंदाजीची नक्कल केली आहे. ही नक्कल बुमराहला प्रचंड आवडली आहे. त्याने स्वतः आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

नेमकी काय आहे ट्विट?

चाहत्याने बुमराहच्या नक्कलचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. यासोबतच आपली आई बुमराहच्या कामगिरीवर प्रचंड खुश झाल्यामुळे आईने बुमराहची नक्कल करण्याचे ठरवले, असे चाहत्याने म्हटले आहे. बुमराहला देखील हा व्हिडिओ आवडला. त्याने हा व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओने माझा दिवस बनवला, असे म्हटले.

विश्वचषकात बुमराहची उल्लेखनीय कामगिरी

२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत जसप्रीत बुमराहने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने संपूर्ण विश्र्वचषक स्पर्धेत ९ सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या. याशिवाय फलंदाजांवर दबाव टाकण्यात बुमराह यशस्वी झाला. त्यामुळेच विश्वचषक स्पर्धेत तो नंबर एकचा खेळाडू ठरला. दरम्यान, विश्वचषकात उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा पराभव केल्यामुळे भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. मात्र संपूर्ण विश्र्वचषकात चांगल्या कामगिरीच्या बाबतीत भारताचा बोलबोला झाला.


हेही वाचा – कोण होणार नवा जगज्जेता?

First Published on: July 14, 2019 8:06 AM
Exit mobile version