Virat Kohli vs BCCI: हे तर आगीत तेल ओतण्याचं काम, कोहली-बीसीसीआय वादावर माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

Virat Kohli vs BCCI: हे तर आगीत तेल ओतण्याचं काम, कोहली-बीसीसीआय वादावर माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने डिसेंबरच्या महिन्याच्या सुरूवातीला एक कठोर निर्णय घेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं आहे. विराटच्या जागी बीसीसीआयने हिटमॅन रोहित शर्मावर जबाबदारी सोपवली आहे. विराट कोहली विरूद्ध बीसीसीआय असा संघर्ष देखील पहायला मिळाला. भारतीय संघाची काल(शुक्रवार) आफ्रिका वनडे मालिकेसाठी घोषणा करण्यात आली. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या विधानांना दुजोरा दिला आहे. मात्र, हे तर आगीत तेल ओतण्याचं काम, अशा प्रकारची प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने केली आहे.

विराट कोहलीला कर्णधारपदावरून दुर केल्यानंतर सौरव गांगुलीने दावा केला होता. सिलेक्टर्सनी विराटला कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती, असा दावा सौरव गांगुली यांनी केला होता. परंतु विराटने त्यांचं ऐकलं नाही आणि कर्णधारपद सोडलं. विराटने घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांगुली यांनी केलेल्या दाव्याच्या विरोधात काही विधानं देखील केली आहेत. मात्र, चेतन शर्मा यांनी गांगुली यांच्या दाव्यालाच दुजोरा दिला आहे.

निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी जे काही विधान केलं, त्यामुळे विराट-बीसीसीआय वादात आगीत तेल ओतल्याचाच प्रकार घडला आहे. चेतन शर्मा यांनी आपली बाजू मांडली. परंतु विराट आणि बीसीसीआय यांच्यामध्ये आधीपासूनच वाद सुरू होता,असं दिसत होतं. मात्र, चेतन शर्मा यांच्या विधानामुळे आता या वादात भर पडल्याचं आकाश चोप्रा यांनी सांगितलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत रवाना होण्यापूर्वीच विराटने सांगितलं की, टी-२० चं कर्णधारपद सोडण्यासाठी त्यांनी सांगितलं नव्हतं. सगळ्यांनी या गोष्टीला पॉझिटिव्हली घेतलं आहे. दरम्यान, १९ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका टीम इंडिया खेळणार आहे.


हेही वाचा : UP Assembly Election 2022 : ३०० युनिट वीज मोफत देणार, यूपी निवडणुकीपूर्वी अखिलेश यादवांची मोठी घोषणा


 

First Published on: January 1, 2022 5:06 PM
Exit mobile version