IND vs SA Test series : अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे खूप कठीण; गौतम गंभीरचा दावा

IND vs SA Test series : अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे खूप कठीण; गौतम गंभीरचा दावा

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डातर्फे (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी २८ खेळाडूंच्या संघाची काही दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे. भारतीय संघ येत्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे या दौऱ्याची सुरुवात २६ डिसेंबर पासून होणार आहे. मात्र सध्या आपल्या खराब फॉर्ममुळे कसोटी संघाचे उपकर्णधारपद गमावलेल्या मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेला आता भारतीय कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण झाले आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत अनुभवी फलंदाज रहाणेला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले जाईल, असे माजी सलामीवीर गौतम गंभीरने म्हंटले आहे. भारताला ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जायचे आहे. मात्र खराब फॉर्ममुळे रहाणेसाठी आता अडचणी वाढत आहेत.

गौतम गंभीरने एका वृत्तवाहिनिशी बोलताना म्हंटले की, “खरं सांगायचं तर मला वाटतं अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे खूप कठीण जाईल. ‘श्रेयस अय्यरला संघात संधी न देणे भारतासाठी किंवा कर्णधारासाठी खूप कठीण जाईल. कारण त्याने मागील काही कालावधीत चांगली कामगिरी केली आहे. तसेच हनुमा विहारीनेही फलंदाजीतून चमत्कार केला आहे. असे गंभीरने आणखी म्हंटले.

दरम्यान, भारतीय संघांचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी रहाणेच्या संघातील समावेशाचे समर्थन केले आहे. ‘दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणेला स्थान मिळाले आहे आणि त्याचीही संघात निवड झाली पाहिजे, कारण तिथे संघाला नक्कीच अनुभवाची गरज असेल. तर रहाणेकडे विदेशी खेळपट्टीवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. असे बांगर यांनी म्हंटले.


हे ही वाचा: http://Football : बार्सिलोनाच्या युवा संघाच्या माजी संचालकावर लैंगिक छळाचा आरोप; ६० हून अधिक विद्यार्थ्यांची तक्रार


 

First Published on: December 13, 2021 3:59 PM
Exit mobile version