गौतम गंभीरची तृतीय पंथीयांच्या सन्मानार्थ कार्यक्रमात स्त्री वेशात एन्ट्री

गौतम गंभीरची तृतीय पंथीयांच्या सन्मानार्थ कार्यक्रमात स्त्री वेशात एन्ट्री

सौजन्य - हिंदुस्तान टाईम्स

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने तृतीय पंथीयांच्या एका कार्यक्रमात चक्क साडी घालून स्त्री वेशात प्रवेश केला असून तृतीय पंथीयांना सन्मान देण्यासाठी त्याने असे केले असून तो नेहमीच तृतीय पंतीयांच्या समर्थनात भाष्य करताना दिसून येतो. गौतमच्या या वागण्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्याचा स्त्री वेशातील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सौजन्य – लोकमत

रक्षाबंधनलाही गंभीरने केला होता सन्मान

गौतम गंभीरने याआधीही तृतीय पंथीयांच्या समर्थनात कार्य केले आहे. रेडिओ चॅनेलच्या एका कार्यक्रमात गौतमने रक्षाबंधनच्या वेळी तृतीय पंथीयांकडून राखी बांधून घेतली होती. त्याने ते फोटो आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरही पोस्ट केले होते. त्यात त्याने एक संदेशही देखील लिहिला होता. त्याने लिहीले होतेकी, ‘पुरुष किंवा स्त्री असणे महत्त्वाचे नसून तुम्ही चांगली व्यक्ती असणे महत्त्वाचे आहे.’

गंभीर वर्ल्डपक हिरो

गौतम गंभीर भारताचा सलामीवीर असून एक उत्तम बॅट्समन आहे. भारताने जिंकलेल्या दोन्ही विश्वचषकात गंभीरची कामगिरी महत्त्वाची असून २००८ च्या टी-२० वर्ल्डपकमध्ये त्याने ७५ धावा केल्या होत्या गंभीर वगळता कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नव्हती. तर २०११ च्या विश्वचषकात गंभीरने ९७ धावा केल्या होत्या. मात्र गेली काही वर्षे गंभीर भारताच्या संघांत नसून त्याने अखेरचा एकदिवसीय सामना २०१६ मध्ये खेळला होता.

First Published on: September 14, 2018 1:08 PM
Exit mobile version