गावस्कर संघाला जेतेपद

गावस्कर संघाला जेतेपद

Gavaskar team

तुषार सिंगच्या (१६१) नाबाद शतकी खेळीच्या बळावर गावस्कर संघाने पाहुण्या विदर्भ संघाला नमवून दिलीप वेंगसरकर फौंडेशन आयोजित टोटल कप या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवले. दुसर्या लढतीत वेंगसरकर संघाने तेंडुलकर संघाला पहिल्या डावातील आघाडीवर पराभूत केले. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून तुषार सिंगची, सर्वोत्तम फलंदाज म्हणून श्री चौधरीची (दोन शतके) आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निशित भल्लाची (१६ बळी) निवड झाली.

कर्नाटक स्पोर्टींग येथील लढतीत विदर्भाचा डाव १६७ धावांत आटोपल्यानंतर गावस्कर संघाने ६ बाद ३५० अशी धावसंख्या उभारत ही स्पर्धा जिंकली. त्यांच्याकडून तुषार सिंगने अप्रतिम फलंदाजी करत नाबाद १६१ धावांची खेळी केली. त्याला प्रतीक यादव (५९) आणि ऋषिकेश गोरे (४२) यांनी मोलाची साथ मिळाली. विदर्भ संघाच्या शिवम निंबाळकर आणि देवांश ठक्कर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक –
विदर्भ : सर्वबाद १६७ वि. गावस्कर संघ : ९६ षटकांत ६ बाद ३५० (तुषार सिंग नाबाद १६१, प्रतिक यादव ५९, ऋषिकेश गोरे ४२; शिवम निंबाळकर २/४१, देवांश ठक्कर २/४४)

वेंगसरकर संघ : ६ बाद २४९ डाव घोषित आणि १४ षटकांत ३ बाद ३० वि. तेंडुलकर संघ : ६६.५ षटकांत सर्वबाद १५९ (प्रणय राना ५६, आदित्य चव्हाण २९; पल्लव दांडेकर ५/४२, रवी गुप्ता ३/४०)

First Published on: May 25, 2019 4:37 AM
Exit mobile version