Asian Para Games 2018 : तिरंदाज हरविंदर सिंगने पटकावले सुवर्ण

Asian Para Games 2018 : तिरंदाज हरविंदर सिंगने पटकावले सुवर्ण

हरविंदर सिंग

इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताचा तिरंदाज हरविंदर सिंगने सुवर्णपदक पटकावले. बुधवारी भारताने या स्पर्धेत ९ पदके पटकावली. मोनू घांगस (थाळीफेक), विजय कुमार (लांब उडी) आणि भाविनाबेन पटेल-सोनलबेन पटेल (बॅडमिंटन) यांनी रौप्यपदके पटकावली.

भारताचे सातवे सुवर्णपदक  

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताचा तिरंदाज हरविंदर सिंगने  सुवर्णपदक पटकावले. हरविंदर सिंगने तिरंदाजीच्या अंतिम फेरीत चीनच्या झाओ लिक्स्युचा ६-० असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. हरविंदरने जिंकलेले हे भारताचे या स्पर्धेतील सातवे सुवर्णपदक आहे.

हरभजनकडून अभिनंदन 

आशियाई पॅरा गेम्सच्या तिरंदाजीतील पहिले सुवर्णपदक पटकावल्यानंतर हरविंदर सिंगचे भारताचा क्रिकेटर हरभजन सिंगने अभिनंदन केले.

 

First Published on: October 10, 2018 11:14 PM
Exit mobile version