PBKS vs GT : राहुल तेवतीयाची तुफानी खेळी; गुजरातचा 3 विकेट्सनी पंजाबवर विजय

PBKS vs GT : राहुल तेवतीयाची तुफानी खेळी; गुजरातचा 3 विकेट्सनी पंजाबवर विजय

IPL 2024, मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात गुजरातने ३ विकेट्सनी पंजाबचा पराभव केला. गुजरातसमोर पंजाबने 143 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर १४७ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला. अष्टपैलू राहुल तेवतीयाच्या खेळीच्या जोरावर गुजरातने हा विजय मिळवला. तेवतीयाने 18 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या. (Gujarat Titans Win By 3 Wickets Against Punjab Kings In Ipl 2024)

पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (मुल्लानपूर) येथे खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने विजय मिळवत यंदाच्या पर्वातील आपला चौथा विजय नोंदवला. या विजयासह गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जविरुद्धच्या मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. या विजयनानंतर गुजरातच्या गुणांमध्ये वाढ झाली असून, त्याचे ८ गुण झाले आहेत. आयपीएल 2024च्या गुणतालिकेत गुजरात सहाव्या स्थानावर आहे. तसेच, पंजाब किंग्ज या पराभवानंतर नवव्या स्थानावर घसरला आहे.

हेही वाचा – KKR vs RCB : 6, 4, 4, 6, 4, 4 कोलकाताच्या Phil Salt ची तुफानी खेळी; एका षटकांत केल्या 28 धावा

या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 143 धावांचे लक्ष्य दिले होते. पंजाबने दिलेल्या 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली होती. गुजरातचे सलामीवर साहा आणि गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी झाली. मात्र, पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने संघाला पहिला धक्का दिला. त्याने साहाला बाद केले.

राहुल तेवतियाच्या जोरावर गुजरातचा विजय

पंजाबने दिलेल्या 143 धावांचा पाठलाग करताना गुजरातने सुरुवात चांगली केली. परंतू, त्यांना खेळी टिकवता आली नाही. एकामागोमाग एक खेळाडू बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर गुजरातचा अष्टपैलू राहुल तेवतिया फलंदाजीसाठी आला. त्यावेळी त्याने सुरुवातीला संयमाने फलंदाजी केली आणि डावाच्या 18 व्या षटकात 3 चौकार आणि एका षटकारासह 20 धावा करून सामना आपल्या बाजून वळवला. तेवतियाने 18 चेंडूत 36 धावांची तुफानी खेळी करत गुजरात टायटन्सचा 3 गडी राखून विजय निश्चित केला.


हेही वाचा – RCB vs KKR : कोलकाताच्या रिंकू सिंगवर विराट कोहली नाराज; म्हणाला, आता काय करू…, व्हिडीओ व्हायरल

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 22, 2024 9:48 AM
Exit mobile version