करूण नायर संघात हवा होता – हरभजन  

करूण नायर संघात हवा होता – हरभजन  
४ ऑक्टोबरपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठीच्या संघाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. या संघात फलंदाज करूण नायरचा समावेश नव्हता. याआधी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी करूण नायरला भारतीय चमूत स्थान मिळाले होते. पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. खेळण्याची संधी न देताच वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी करूणला संघातून वागल्यामुळे अनेकांना निवड समितीवर टीका केली. टीका करणाऱ्यांत आता हरभजन सिंगचाही समावेश झाला आहे.

संघ निवडीचे निकष प्रत्येकासाठी वेगळे

हरभजन सिंग निवड समितीवर टीका करताना म्हणाला, “एखादा खेळाडू तीन महिने फक्त बसून आहे. त्याला खेळण्याची एकही संधी मिळत नाही. असे असताना तो खेळाडू अचानक संघात राहण्यालायकही उरत नाही ? हे सगळे मला कळण्या पलीकडचे आहे. या निवड समितीचे संघ निवडीचे निकष प्रत्येक खेळाडूसाठी वेगळे आहेत. काही खेळाडू चांगले प्रदर्शन न करताही संघात टिकून राहतात. तर काही खेळाडू एकाद-दोन सामने खराब खेळले की त्यांना संघातील स्थान गमवावे लागते. हे योग्य नाही.”
करूण नायर  (सौजन्य – DNA)

संघ व्यवस्थापन-निवड समितीने एकत्रित काम करणे आवश्यक

हरभजन पुढे म्हणाला, “करूण नायरला जर संधी द्यायची नव्हती तर त्याला इंग्लंडला नेलेच कशासाठी. करूणला संघात निवडताना निवड समितीने कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाशी चर्चा केली होती का? जर त्यांना करूण संघात नको होता तर त्याच्याजागी जो खेळाडू व्यवस्थापनाला हवा होता त्याच्याविषयी निवड समितीने विचार केला होता का? हे प्रश्नच आहेत. मला आशा आहे की संघ व्यवस्थापन आणि निवड समिती एकत्रित काम करत असतील.”
First Published on: October 2, 2018 5:02 PM
Exit mobile version