इन्स्टाग्राम सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटचे नाव, एका पोस्टमागे कामावतोय ‘इतके’ रुपये

इन्स्टाग्राम सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटचे नाव, एका पोस्टमागे कामावतोय ‘इतके’ रुपये

इन्स्टाग्राम सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटचे नाव, एका पोस्टमागे कामावतोय 'इतके' रुपये

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा फॅन फॉलोविंग फक्त भारतातच नाही जगभरात आहे. त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोवर्समधून हे वेळोवेळी दिसून आले आहे. Hopper HD Instagram Richlist 2021च्या यादीनुसार, विराट कोहलीने इंन्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपले आपले नाव कमावले आहे. इन्स्टाग्राम विराट कोहलीचे १३ कोटींहून अधिक फॉलोवर्स आहेत. भारतात सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करणारा विराट कोहली हा सर्वात अव्वल ठरला आहे. Hopper HD Instagram Richlist 2021च्या यादीनुसार विराट त्याच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून एका स्पोन्सर्ड पोस्टसाटी तब्बल ६ कोटी रुपये घेतो. दोन वर्षापूर्वी विराटला एका पोस्टसाठी १.३५ कोटी रुपये मिळत होते. केवळ दोन वर्षात विराटची कमाई तब्बल तीनपटींनी वाढली आहे. (Hopper HD Instagram Richlist 2021 Virat kohli list of highest earning player)


तर पोर्तुगाल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर ३० कोटींहून अधिक फॉलोवर्स आहेत. सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्यांच्या यादीत रोनाल्डोचा पहिला क्रमांक लागतो. रोनाल्डो नंतर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कोटींची कमाई करणाऱ्यांच्या यादीत मेस्सी, नेयमार आणि त्यानंतर चौख्या क्रमांकावर विराट कोहलीचे नाव येते. Instagram Richlistच्या १००जणांच्या यादीत विराट कोहलीसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे नाव देखील आहे. प्रियांका या लिस्टमध्ये २७व्या क्रमांकावर आहे. प्रियांकाला एका पोस्टसाठी ३ कोटी रुपये मिळतात.


रोनाल्डोप्रमाणेच WWE स्टार डवेन जॉन्सनचे देखील २४ कोटींहून अधिक फॉलोवर्स झाले आहेत. रोनाल्डोनंतर ड्वेन जॉन्सन दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१९ -२० मध्ये रोनाल्डो एका इन्स्टाग्राम पोस्टमधून ५०.३ मिलियन कमाई होत होती.


हेही वाचा – कोहलीबाबत विल्यमसनचे मोठे विधान, म्हणाला… 

 

 

 

 

First Published on: July 1, 2021 7:03 PM
Exit mobile version