रायुडूच्या गोलंदाजीवर नोंदवला आक्षेप

रायुडूच्या गोलंदाजीवर नोंदवला आक्षेप

फाईल फोटो

भारतीय क्रिकेट संघात आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष खेचून घेणारा गोलंदाज अंबाती रायुडू आता त्याच्या गोलंदाजीमुळे अडचणीत येण्याची दाट आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये अंबातीने फिरकी गोलंदाजी केली होती. दरम्यान, अंबातीच्या या चेंडू फेकीवर आक्षेप नोंदवला गेला आहे. त्यामुळे आता अंबाती रायडुला येत्या १४ दिवसांमध्ये चाचणी द्यावी लागणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या हाती नायडू याच्या फिरकी गोलंदाजावर आक्षेप घेतल्याचा अहवाल समोर आला. या अहवालामध्ये रायुडूची गोलंदाजीची पद्धत वैध आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, जमेची बाजू म्हणजे या चाचणीचा निकाल येईपर्यंत त्याला सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार आहे.

अचानक प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक आणि विंडीज दौऱ्याच्या वन डे सामन्यात रायुडूने चांगल्या धावा केल्या होत्या. पुढल्या वर्षी इंग्लड येथे होत असलेल्या विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ही निवृत्ती घेतली असल्याची माहिती मिळत आहे. अंबाती रायुडू इंडियन प्रिमीयर लिगमधून खेळत असताना त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सद्या तो चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधीत्व करत आहे.

First Published on: January 13, 2019 5:05 PM
Exit mobile version