ICC : ICCच्या या यादीत युएई, पाकिस्तानच्या खेळाडूंचा दबदबा; भारताचा एकही खेळाडू नाही

ICC : ICCच्या या यादीत युएई, पाकिस्तानच्या खेळाडूंचा दबदबा; भारताचा एकही खेळाडू नाही

ICC Player of The Month, मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सीलने (ICC) एप्रिल महिन्याचे ICC Player of The Monthच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय संघाचा एकही खेळाडू नाही. विशेष म्हणजे युएई, नामीबिया आणि पाकिस्तान या संघाच्या खेळाडूंचा समावेश आहे. (icc player of the month april shaheen afridi mohammad wasim nominate)

गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत भारतीय संघाने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे ICC Player of The Monthच्या यादीत भारतीय संघाच्या खेळाडूंचे नाव नाही.
ही काही मोठी गोष्ट नाही कारण भारतीय खेळाडू हे आयपीएल खेळत आहेत. या काळात भारताने एकही आंतरराष्ट्रीय मालिका खेळलेली नाही. त्यामुळेच या यादीत भारतीय संघातील एकाही खेळाडूचा समावेश नाही.

आयसीसीने जाहीर केलेल्या ICC Player of The Monthच्या खेळाडूंच्या यादीतील पहिले नाव नामीबियाचा खेळाडू गेरहार्ड इरासमस याचे आहे. गेरहार्ड हा नामीबियाचा कर्णधार आहे. एप्रिल महिन्यात गेरहार्डने दमदार कामगिरी केली होती. त्याने टी 20 मालिकेत गोलंदाजी आणि फलंदाजीत देखील दमदार कामगिरी केली. या मालिकेत तो प्लेअर ऑफ द मॅच देखील झाला होता.

युएईचा खेळाडू मोहम्मद वसीम एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला फार काही चांगली कामगिरी करू शकला नव्हता. मात्र त्याने आपला फॉर्म परत मिळवत कुवैत विरूद्धच्या मालिकेत तीन सामन्यात प्रत्येकी 65, 48 आणि 45 अशा धावा केल्या. त्याचबरोबर एसीसी प्रीमियर कपच्या अंतिम सामन्यात वसीमने दमदार शतक देखील ठोकले होते.

याशिवाय, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने न्यूझीलंडविरूद्धच्या टी-20 मालिकेत दमदार कामगिरी केली. शाहीन हा या मालिकेत पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शाहीनच्या भेदक माऱ्यामुळं पाकिस्तानने न्यूझीलंडला 90 धावात गुंडाळले. या सामन्यात आफ्रिदीने 13 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंडची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.


हेही वाचा – India Jersey Launch : टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाच्या जर्सीचे हटके लॉचिंग; व्हिडीओ व्हायरल

Edited By – Vaibhav Patil

First Published on: May 6, 2024 9:43 PM
Exit mobile version