ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत केएल राहुलची १८ स्थानांची झेप, कोहलीला मोठा झटका

ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत केएल राहुलची १८ स्थानांची झेप, कोहलीला मोठा झटका

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार लोकेश राहुलने आयसीसी कसोटी क्रमवारीत १८ स्थानांची झेप घेतली आहे. तसेच त्याने ३१ वा क्रमांक पटकावला आहे. परंतु रनमशीन विराट कोहलीला मोठा झटका बसला असून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम पुन्हा एकदा वरचढ ठरला आहे. केएल राहुलने शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ११३ धावांनी पराभव केला. भारताने सेंच्युरियन कसोटीत ११३ धावांनी विजय मिळवल्यामुळे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आणि लोकेशच्या नेतृत्त्वाखाली त्यांचे लक्ष मालिका जिंकण्याकडे आहे.

भारताचा सेंच्युरियनवर ऐतिहासिक विजय

२०१७ मध्ये केएल राहुलने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ८ वे स्थान पटकावले होते. तसेच त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. पहिल्या कसोटीत १२३ धावांची खेळी करताना मयांक अग्रवालसह ११७ धावांची भागीदारी केली होती. मात्र, त्याच्या या कामगिरीवर भारताने सेंच्युरियनवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्याचसोबतच कसोटी सामना जिंकणारा भारत पहिला आशियाई देश ठरला आहे.

जसप्रीत बुमराह – शमी टॉप टेनमध्ये

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांमध्ये टॉप टेनमध्ये पोहोचला आहे. तर मोहम्मद शमीने देखील उंच झेप घेतली आहे. पहिल्या सामन्यात बुमराहने ५ गडी बाद केले होते आणि त्याच्या क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा झाली असून तो ९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे ८ गडी बाद करत शमी १७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे पाहिलं असता कागिसो रबाडाही ६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. लुंगी एनगिडीने आठ गडी बाद करत १६ व्या क्रमांकानुसार ३० व्या स्थानावर झेप घेतली आहे. तर आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने १४ वं स्थान गाठलं आहे.


हेही वाचा : Ind Vs Sa : ऋषभ पंतचा नवा रेकॉर्ड, Ms Dhoniच्या विशेष क्लबमध्ये मिळवली एन्ट्री


 

First Published on: January 5, 2022 7:02 PM
Exit mobile version