‘हा’ इंग्लंडचा महान खेळाडू करतो मेट्रोने प्रवास

‘हा’ इंग्लंडचा महान खेळाडू करतो मेट्रोने प्रवास

इंग्लंडचा हा खेळाडू करतो मेट्रोने प्रवास

आजकाल थोडीजरी प्रसिद्धी आलीतरी कोणीही आपल राहणीमान लगेच बदलतात. त्यात सिनेस्टार किंवा क्रिकेटर्स यांची सामान्य जनतेतील क्रेझ पाहता त्यांचे राहणीमान लगेचच बदलते. मात्र इंग्लंडचा एक महान खेळाडू आजही सामान्य जनतेसोबत मेट्रोतून प्रवास करतो. हा महान खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून आहे ‘अॅलेस्टर कूक’.

अलेस्टर कुक

वाचा – इंग्लंडचा महान बॅट्समन अॅलिस्टर कूक होणार निवृत्त !

भारताविरूद्ध आपली कारकिर्दीतील शेवटची टेस्ट मॅच खेळत असलेला कूक मॅच साठी घरातून येताना मेट्रोने प्रवास करतो. हे एकून तुम्ही हैराण झालाच असाल. ‘Ploughmans CC’ या क्रिकेट क्लबने आपल्या ट्विटर हँडलवरून कूकचा मेट्रो स्टेशनवरील फोटो पोस्ट केला असून यात कूकसोबत त्याचा सहखेळाडू जेम्स अँडरसनही दिसून येत आहे.


सध्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील टेस्ट मॅच ही इंग्लंच्या ओव्हल मैदानावर सुरू असून कूकचे घर मैदानापासून थोड्या अधिक अंतरावर आहे. त्यामुळे तो घरी ये-जा करण्यासाठी मेट्रोचा वापर करतो. इतर खाजगी वाहणापेक्षा मेट्रो त्याला जास्त सोयीस्कर पडते असे त्याचे म्हणने आहे. विशेष म्हणजे कूकला सोबत म्हणून त्याचे सहखेळाडू जेम्स अँडरसन,जेनिग्ज,वॉली हेही मेट्रोने प्रवास करतात. तसेच कूक असा प्रवास पहिल्यांदाच करत नसून याआधीही त्याने सार्वजनिक वाहणाने प्रवास केला असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट समितीतील सदस्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.

…आणि प्रवाशांनी केला कूकला भावूक

शुक्रवारच्या सामन्यात कूकने सलामी देत अप्रतिम ७१ धावा केल्या. त्यानंतर घरी जात असताना कूक ज्या मेट्रोच्या डब्ब्यात चढला. तेथील सर्व प्रवाशांनी उभे राहून कूकचे अभिनंदन केले. दरम्यान या सगळ्याने कूकला फार आनंद झाला आणि तो भावूक झाला.

First Published on: September 9, 2018 4:08 PM
Exit mobile version