‘देख लेंगे’, कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माने दिला इंग्लंडला इशारा

‘देख लेंगे’, कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माने दिला इंग्लंडला इशारा

कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्माने दिला इंग्लंडला इशारा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला सामना नॉटिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेसाठी भारतीय संघ सरावात घाम गाळत असून दोन हात करण्यासाठी नॉटिंगहॅमला दाखल झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताची पहिली कसोटी मालिका आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा देखील जोरदार तयारी करत आहे. त्याच्या फलंदाजीबरोबरच तो क्षेत्ररक्षणावरही मेहनत घेताना दिसतोय. दरम्यान, मालिका सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माने इंग्लंडला इशारा दिला आहे.

रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने चार फोटो शेअर केले आहेत. फोटोसोबत रोहित शर्माने त्यावर एक कॅप्शन लिहिलं असून आता चर्चेचा विषय बनला आहे. रोहितच्या कॅप्शनने चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोहित शर्माने कॅप्शन हिंदीत लिहलं आहे. गेले काहि दिवस रोहित शर्मा हिंदीमध्ये कॅप्शन देत आहे. रोहितची ही स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरल्याचं दिसून येत आहे.

‘प्रक्रियेचा आनंद घ्या, बाकीचं बघू,’ असं रोहितने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. रोहित तंदुरुस्त दिसत आहे. त्याने त्याच्या फिटनेसवरही खूप मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी रोहितचं वजनही कमी झाल्याचं म्हटलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चाहत्यांना रोहितकडून खूप आशा आहेत.रोहित नक्कीच २-३ शतके ठोकेल, अशी आशा चाहत्यांना आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील या कसोटी मालिकेबरोबरच आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा हंगामही सुरू होईल.

भारतीय संघ

रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, रिषभ पंत, केएल राहुल, वृद्धिमान साहा, जसप्रीत बुमराह , इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.

 

First Published on: August 3, 2021 12:06 PM
Exit mobile version