भारताला सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी केवळ एका विजयाची गरज

भारताला सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी केवळ एका विजयाची गरज

Team India

विश्वचषक २०१९मधील वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून ११ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. गुरुवारी झालेल्या मॅच मध्ये कर्णधार विराट कोहलीच्या उत्तम खेळी केली आहे. वेस्ट इंडीज विरुद्ध सामन्यात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि मोहम्मद शमीने चांगली भुमिका पार पाडत वेस्ट इंडीज संघाचे कंबर मोडले.

भारत विरूद्ध वेस्ट इंडीजच्या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकासह त्याच्या करिअरचे २० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात विराटने ७२ धावा केल्या आहेत. महेंद्र सिंह याने संयमी खेळी करत भारताचा स्कोर २६८ वर नेऊन ठेवला. गोलंदाजी करायला आलेल्या भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने ४ विकेट घेतले आहे. धोनीचे नाबाद अर्धशतक आणि शमीने घेतलेल्या ४ महत्वाच्या विकेटमुळे भारताने १२६ धावांनी जिंकत आपले सेमीफायनलचे तिकिट पक्के केले आहे. सद्यपरिस्थिती मध्ये भारत हा एकमेव अजिंक्य संघ आहे. विश्वचषकातील एकूण सहा पैकी ५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला असून एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे भारतीय संघ सध्या ११ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने यापूर्वीच आपले स्थान सेमिफायनल मध्ये पक्के केले आहे.

कालच्या सामन्यात भारताविरुद्ध हार पत्करावी लागल्याने वेस्ट इंडिज ला विश्वचषकमधून गाशा गुंडाळावा लागला आहे यामुळे मात्र, भारताच्या विजयानं पाकिस्तानला फायदा झाला आहे.भारताचे आता इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याविरोधात सामने बाकी आहे आणि भारताला सेमिफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ एक विजयाची अपेक्षा आहे.
भारताचा पूढील सामना ३० जून रोजी इंग्लंड विरुद्ध होत आहे.

First Published on: June 28, 2019 1:47 PM
Exit mobile version