India vs England Test : कोर्ट केसमध्ये स्टोक्स निर्दोश तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणार

India vs England Test : कोर्ट केसमध्ये स्टोक्स निर्दोश तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणार

फोटो सौजन्य - क्रोनीकल लाइव्ह

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टेस्ट सामन्यांच्या मालिकेत पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम अष्टपैलु कामगिरी करणाऱ्या बेन स्टोक्सला त्याच्यावर सुरू असलेल्या एका कोर्टकेसमुळे दुसरा सामन्यासाठी मुकावे लागले होते. मात्र कोर्टातील सुनावणीत समोरच्या वकिलाने केलेले आरोप वैध नसल्याने स्टोक्सला निर्दोश मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे तो आता तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंड संघाकडून खेळणार आहे.

नक्की काय आहे प्रकरण

गेल्या वर्षी २५ सप्टेंबर २०१७ ला इंग्लंडच्या ब्रिस्टल येथे एका नाइट क्लब बाहे झालेल्या हाणामारीत बेन स्टोक्सने रेयान हेल आणि रेयान अली या दोघांना अगदी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. याच केसमद्दलच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी वकिलाने केलेले आरोप वैध नसल्याने स्टोक्सला निर्दोश मुक्तता देण्यात आली आहे.

तिसरी कसोटी भारतासाठी मालिकेत राहण्याची शेवटची संधी

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिले दोन सामने भारताच्या हातातून निसटले आहेत. त्यामुळे मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला तिसरी कसोटी जिंकण्याची गरज आहे. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर इंग्लंड ३ च्या फरकाने आघाडी घेईल आणि मालिकाही जिंकेल. त्यामुळे भारताला मालिकेत टिकण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य संघ

भारत – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, उमेश यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, शार्दूल ठाकूर.

इंग्लंड – जो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कूक,बेन स्टोक्स, किटन जेनिंग्स, जॉनी बेरस्टोव, जोस बटलर, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, सॅम करन, मोईन अली, जेमी पोर्टर, क्रिस वोक्स, ऑली पोप.

First Published on: August 15, 2018 11:08 AM
Exit mobile version