Ind Vs Aus: मोहम्मद शमी मालिकेबाहेर; ‘हा’ खेळाडू करणार कसोटीत पदार्पण

Ind Vs Aus: मोहम्मद शमी मालिकेबाहेर; ‘हा’ खेळाडू करणार कसोटीत पदार्पण

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. पराभवाच्या धक्क्यात असताना भारतीय संघाला अजून एक धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेला आहे. मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने त्याला उर्वरित तीन कसोटी सामन्यांतून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी मोहम्मद सीराज दुसऱ्या कसोटीत पदार्पण करु शकतो, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. सीराजने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे शमीच्या जागी त्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजीदरम्यान पॅट कमिन्सचा उसळता चेंडू जोरात शमीच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदळला होता. यामुळे त्याला आपला हात वर उचलनेही अवघड झाले होते. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. शमीची दुखापत भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरली असून शमी मालिकेबाहेर गेल्याने कोणता गोलंदाज खेळवायचा असा प्रश्न भारतीय संघाला पडला आहे. भारतीय संघ आता उमेश यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान गोलंदाजीसाठी अवलंबून आहे. शमीच्या जागी भारतीय संघात मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी या पैकी एकाला संधी मिळू शकते. सराव सामन्यात सीराजने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरी कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ विराट आणि शमीशिवाय मैदनात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.

शमीच्या जागी भारतीय संघात मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे. दोन सराव सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. मेलबर्न मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो पदार्पण करू शकतो. भारताचा कर्णधार विराट कोहली देखील पुढील सामन्यांसाठी नसणार आहे. तो बाप होणार असून त्यासाठी भारतात येणार आहे. विराट नसल्याने त्याच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून कोणाला घ्यायचे असा प्रश्न पडलेला असताना आता शमीच्या फॅक्चरमुळे भारतीय गोलंदाजीची धार कमी होईल की काय अशी काळजी वाटू लागली आहे.

 

First Published on: December 20, 2020 12:28 PM
Exit mobile version