IND vs ENG : ‘गांगुलीप्रमाणेच कोहलीही आक्रमक कर्णधार, पण दोघांमध्ये तुलना नको’!

IND vs ENG : ‘गांगुलीप्रमाणेच कोहलीही आक्रमक कर्णधार, पण दोघांमध्ये तुलना नको’!

विराट कोहली आणि सौरव गांगुली

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या मैदानातील वागणुकीबाबत नेहमीच चर्चा होते. कोहली त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. तो कर्णधार म्हणून सामना जिंकण्यासाठी आक्रमक निर्णय घ्यायला घाबरत नाही. तसेच कोणत्याही भारतीय गोलंदाजाने विकेट घेतल्यावर तो मोठ्याने ओरडून जल्लोष करतो. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूने डिवचल्यास तो प्रत्युत्तर देतोच. त्याच्या या आक्रमकतेचे अनेक चाहते आहेत, तर काहींना त्याचा हा आक्रमकपणा फारसा आवडत नाही. आक्रमक कर्णधार म्हणून त्याच्यात आणि सौरव गांगुलीमध्ये बरेचदा तुलना केली जाते. हे दोघेही कर्णधार म्हणून आक्रमक असले, तरी त्यांच्यात तुलना करणे योग्य नसल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने व्यक्त केले.

सौरव, कोहलीचे व्यक्तिमत्व वेगळे

सौरव खूप आक्रमक होता. त्याच्याइतका निडरपणे बोलणारा व्यक्ती मी पाहिलेला नाही. सौरवचे व्यक्तिमत्व वेगळे होते. कोहलीचे गुणधर्म वेगळे आहेत, महेंद्रसिंग धोनीचे गुणधर्म वेगळे आहेत. खेळाडू म्हणून तुमचा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो. यशस्वी ठरण्यासाठी प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या गोष्टी करतो. मैदानात आक्रमकपणे खेळणे आणि सतत बोलून खेळाडूंना मार्गदर्शन करणे सौरवसाठी फायदेशीर ठरायचे. हीच गोष्ट बहुधा कोहलीला लागू पडते, असे आगरकर एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

दोघेही वेगवेगळ्या काळात खेळले

तुम्ही जोपर्यंत रेष ओलांडून गैरवर्तणूक करत नाही, तोपर्यंत आक्रमकता दाखवण्यात काहीच चुकीचे नाही. परंतु, सौरव आणि कोहलीमध्ये तुलना करण्याची गरज काय? दोघेही वेगवेगळ्या काळात खेळले. सौरवने कर्णधार आणि फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. कोहलीही यशस्वी कर्णधार असून तितकाच उत्कृष्ट फलंदाज आहे, असे आगरकरने नमूद केले. आगरकर बरेच सामने गांगुलीच्या नेतृत्वात खेळला होता.


हेही वाचा – कोहलीने प्रथम फलंदाजी घेऊन धोका पत्करला; माजी क्रिकेटपटूची टीका


 

First Published on: August 27, 2021 5:18 PM
Exit mobile version