IND vs NZ 2nd Test : कोहलीच्या विकेटने वादाला तोंड फुटले; माजी क्रिकेटपटूंची आली प्रतिक्रिया

IND vs NZ 2nd Test : कोहलीच्या विकेटने वादाला तोंड फुटले;  माजी क्रिकेटपटूंची आली प्रतिक्रिया

भारतीय कर्णधार विराट कोहलीचे भारतीय संघातील पुनरागमन निराशाजनक झाले. कोहली मुंबईतील कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याच्या चौथ्या चेंडूवर खाते न उघडताच बाद झाला. त्याला न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने सामन्याच्या ३० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद केले. पटेलने विराटला खेळपट्टीच्या समोरच फसवून माघारी पाठवले. मात्र पंचाच्या निर्णयानंतर विराटला बाद देण्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे. दरम्यान, कित्येक खेळाडू आणि चाहत्यांनी विराट कोहलीला बाद देण्याच्या निर्णयावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. खेळपट्टीच्या समोरच विराटला एलबीडब्ल्यू म्हणून बाद घोषित करण्यात आले. मात्र अल्ट्राएजमध्ये पॅड आणि बॅट चेंडूवर एकसाथ चिकटताना दिसत होते. त्यामुळे कोहलीला बाद दिल्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

माजी क्रिकेटर वसीम जाफर आणि पार्थिव पटेल यांनी पंचाच्या या निर्णयाला चुकीचे म्हंटले आहे. वसीम जाफर यांनी म्हंटले, “काही स्पष्ट पुरावे नसतील तेव्हा पंचानी कधी-कधी साध्या गोष्टीचा तरी वापर केला पाहिजे”. तर माजी क्रिकेटर पार्थिव पटेलने देखील कोहलीला बाद देण्याच्या निर्णयावरून प्रश्न उपस्थित करताना म्हंटले की, “विराट बाद नव्हता, न्यूझीलंडला नक्कीच या निर्णयावरून फायदा झाला आहे”.

तर दुसऱ्या कॅमेरातून विराटच्या पॅडला बॉल लागलेला दिसत आहे. त्यामुळे टीव्ही अंपायरला कोणता ठोस निर्णय देता आला नाही. दरम्यान टीव्ही अंपायरकडून ठोस निर्णयाचे पुरावे न मिळाल्यामुळे मैदानातील पंचाच्या निर्णयासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंच अनिल चौधरी यांनी टीव्ही अंपायर वीरेंद्र शर्मा यांना पुन्हा तपासण्याची आठवण करून दिली. विराट कोहलीच्या चाहत्यांना त्याच्या आवडत्या मैदानावर वानखेडेवर चांगल्या पुनरागमनाची आशा होती. मात्र पहिल्या डावातच तो पूर्णपणे अयशस्वी ठरला.


हे ही वाचा: http://AUS vs ENG Test : ॲशेस मालिकेपूर्वी इंग्लंडच्या गोलंदाजाला डेविड वॉर्नरर्ची भीती; म्हणाला…


 

First Published on: December 3, 2021 4:53 PM
Exit mobile version