India Vs South Africa Test Match: सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे मौन, हातावर बांधली काळीपट्टी

India Vs South Africa Test Match: सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे मौन, हातावर बांधली काळीपट्टी

भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील कसोटी मालिकेत भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने चांगली सुरुवातही केली परंतु आफ्रिकेच्या संघाकडून सुरुवातीला मौन पाळण्यात आले तसेच हाताला काळी पट्टी बांधून संघातील खेळाडू खेळताना दिसले. खेळाडूंनी आफ्रिकेच्या महान व्यक्तीला श्रद्धांजली वाहिली आहे.

दक्षिण आफ्रिकेचे ९० वर्षीय आर्कबिशप डेसमंड टूटू यांचे निधन झाले आहे. डेसमंड टूटू नोबेल शांति पुरस्कार विजेते होते. त्यांनी आफ्रिकामध्ये वर्णभेदविरोधात लढा दिला आहे. डेसमंड टूटू यांना श्रद्धांजली वाहताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने हाताला काळी पट्टी बांधली आहे. तसेच सामना सुरु करण्यापुर्वी दोन्ही संघाकडून मौन पाळण्यात आले होते. तसेच आफ्रिकेच्या संघाकडून गुडघ्यावर बसून ब्लॅक लाईव मॅटर्सचे समर्थन केलं आहे. टूटू यांना आफ्रिकेत रंगभेद विरोधाचं प्रतिक म्हणूनही ओळखले जाते. रंगभेदाविरोधात अहिंसक लढा दिल्याबद्दल त्यांना १९८४मध्ये शांततेचा नोबल पुरस्काराने गौरवण्यात आलं होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्कबिशप यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी ट्वीट करत म्हणाले की, आर्कबिशपच्या डेसमंड टूटू जगभरातील असंख्य लोकांसाठी मार्गदर्शक होते. मानवी सन्मान आणि समानतेवर त्यांनी दिलेला भर सदैव स्मरणात राहील असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


हेही वाचा : विराटची रविचंद्रन अश्विनसोबत संघातील वर्तणूक अयोग्य, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा आरोप

First Published on: December 26, 2021 6:01 PM
Exit mobile version