IND vs ZIM : दुखापतग्रस्त वॉशिंगटन सुंदरच्या जागी ‘या’ खेळाडूला भारतीय संघाता संधी

IND vs ZIM : दुखापतग्रस्त वॉशिंगटन सुंदरच्या जागी ‘या’ खेळाडूला भारतीय संघाता संधी

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बॉव्वे दौऱ्यावर जाणार आहे. येत्या 18 ऑगस्टपासून भारत आणि झिम्बॉव्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याला दुखापत झाल्यामुळे संघाबाहेर जावे लागले. त्यामुळे सुंदरच्या जागी शाहबाज अहमदचा संघात समावेश करण्यात आला आहे. (India vs Zimbabwe shahbaz Ahmed replaces injured Washington sunder for Zimbabwe series)

इंग्लंड मध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना फिल्डिंग दरम्यान वॉशिंग्टन सुंदरला ही दुखापत झाली होती. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदच्या निवडीवर भारतीय निवड समितीने शिक्कामोर्तब केले. सिलेक्टर्सचा हा निर्णय थोडा हैराण करणारा आहे. कारण शाहबाजच्या नावाची कोणतीही चर्चा नव्हती.

क्षेत्ररक्षण करताना सुंदरला दुखापत

रॉयल लंडन वन डे चषकात लँकेशायर आणि वूस्टरशायर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात सुंदर सहभागी झाला होता. परंतु, क्षेत्ररक्षण करताना सुंदरला दुखापत झाली. त्यावेळी सुंदरला मैदानाबाहेर जावा लागले होते. आता या सामन्यात त्याला गोलंदाजी करता येणार नसल्याची माहिती सुंदरच्या संघाने दिली आहे.

भारत- झिम्बॉव्वे वनडे वेळापत्रक

           सामना                   कधी                ठिकाण

तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बॉवेचा दौरा करणार आहे. याआधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारताने झिम्बॉवे दौरा केला होता. त्यावेळी 2016 मध्ये भारताने झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळली होती.


हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या ‘मतदारांची हंडी’ फोडण्यासाठी आशिष शेलारांचे वरळीत थर

First Published on: August 16, 2022 4:40 PM
Exit mobile version