Ind vs Aus: ‘अजिंक्य’ भारताने कांगारुंना लोळवलं; मालिका २-१ ने खिशात

Ind vs Aus: ‘अजिंक्य’ भारताने कांगारुंना लोळवलं; मालिका २-१ ने खिशात

ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताने बॉर्ड-गावस्कर कोसटी मालिका जिंकली.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चुरशीच्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत २-१ अशी मालिका खिशात घातली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिलेलं होतं. भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धुव्वा उडवत हा सामना ३ गडी राखून जिंकला. शुबमन गील आणि रिषभ पंत भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं ब्रिस्बेनमधील चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ८ गड्यानं विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीनं फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखलात मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं. चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला.

चौथ्या आणि निर्णायक कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात सर्वबाद ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचं कठीण आव्हान पार केलं.

#Live : ऑस्ट्रेलियात भारतानं घडवला इतिहास, ३१ वर्षांनंतर करून दाखवली अतुलनीय कामगिरी!

#Live : ऑस्ट्रेलियात भारतानं घडवला इतिहास, ३१ वर्षांनंतर करून दाखवली अतुलनीय कामगिरी!

Powered by Restream https://restream.io/

#Live : ऑस्ट्रेलियात भारतानं घडवला इतिहास, ३१ वर्षांनंतर करून दाखवली अतुलनीय कामगिरी!

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, 19 January 2021

 

First Published on: January 19, 2021 1:12 PM
Exit mobile version